Twitter'ने इलॉन मस्क यांना बनवले कर्जबाजारी! दर महिन्याला १००० कोटींचे नुकसान, सर्वच योजना फसल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 11:43 AM2023-07-18T11:43:02+5:302023-07-18T11:43:24+5:30

इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यानंतर ट्विटरमध्ये अनेक बदल केले आहेत, यामुळे उत्पत्नातही घट झाली आहे.

twitter lost half of advertising revenue check all details | Twitter'ने इलॉन मस्क यांना बनवले कर्जबाजारी! दर महिन्याला १००० कोटींचे नुकसान, सर्वच योजना फसल्या

Twitter'ने इलॉन मस्क यांना बनवले कर्जबाजारी! दर महिन्याला १००० कोटींचे नुकसान, सर्वच योजना फसल्या

googlenewsNext

इलॉन मस्क यांनी ट्विटर ४४ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतले. उद्योगपती इलॉन मस्क यांच्या ताब्यात ट्विटर गेल्यानंतर यात अनेक बदल केले आहेत, या बदलांमुळे ट्विटर यूजर्स संतप्त झाले आहेत. यासोबतच ट्विटरच्या कमाई आघाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. ट्विटरने ब्लू सब्सक्रिप्शन सुरू केले आहे, यामध्ये ट्विटर चालवण्यासाठी सुमारे ८०० रुपये आकारले जातात. तसेच ट्विटरवरील खर्च कमी करण्यासाठी इलॉन मस्क यांना मोठ्या प्रमाणावर लॉकआउट करण्यात आले. पण इलॉन मस्क यांच्या योजना फेल गेल्या आहेत. कमाईमध्ये ट्विटर पाठिमागे पडले असल्याचे दिसत आहे.ट्विटरचा खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे ट्विटरवर कर्जाचा बोजा वाढत आहे.

अमेरिकेला तेव्हा भारत खपत नव्हता! तीन दशकांपूर्वीच अंतराळात प्रस्थापित झालो असतो, पण...

इलॉन मस्क यांनी १० महिन्यांपूर्वी ट्विटर विकत घेतले. पण आता ट्विटरच्या जाहिरातींच्या कमाईत जवळपास ५० टक्क्यांची घट झाल्याची बातमी आहे. या प्रचंड भारामुळे ट्विटरचे मोठे नुकसान होत आहे. इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्यासाठी खूप पैसे घेतले होते. अशा परिस्थितीत इलॉन मस्क यांना ट्विटरचे व्याज म्हणून सुमारे १.५ अब्ज डॉलर्स म्हणजेच १२ हजार कोटी रुपये वार्षिक द्यावे लागतात. म्हणजेच दरमहा सरासरी १ हजार कोटी रुपये व्याज भरावे लागते.

उत्पन्न वाढवण्यासाठी इलॉन मस्क यांनी ट्विटरवर अनेक नव्या योजना सुरू केल्या.  ब्लू सबस्क्रिप्शनसह प्रीमियम सामग्रीच्या नावावर वापरकर्त्यांकडून पैसे घेण्यात आले. पण कदाचित ट्विटर युजर्सना जोडून ठेवू शकले नाहीत. यामुळेच ट्विटरला मिळणाऱ्या जाहिरातींमध्ये घट नोंदवण्यात आली. आता कंपनी ट्विटरमध्ये व्हिडीओ फीचर आणत आहे, यामुळे मोठ्या प्रमाणात कमाई होण्याची शक्यता आहे. ट्विटरद्वारे लवकरच व्हिडीओ अॅप आणले जाऊ शकते. याच्या मदतीने, वापरकर्ते स्मार्ट टीव्हीवर व्हिडीओ पाहू शकतील.

Web Title: twitter lost half of advertising revenue check all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.