ट्विटर डाऊन! कुणाचंच ट्विट दिसेना, लोडही होईना; जगभरात लाखो युझर्स वैतागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 16:53 IST2023-03-01T16:52:55+5:302023-03-01T16:53:29+5:30

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर वापरण्यात युझर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Twitter down for thousands of users around the world | ट्विटर डाऊन! कुणाचंच ट्विट दिसेना, लोडही होईना; जगभरात लाखो युझर्स वैतागले

ट्विटर डाऊन! कुणाचंच ट्विट दिसेना, लोडही होईना; जगभरात लाखो युझर्स वैतागले

मुंबई-

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर वापरण्यात युझर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जगभरात ट्विटर डाऊन असल्याच्या तक्रारी युझर्सनं केल्या आहेत. तसंच ट्विटर डाऊन हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आला आहे. 

ट्विटरचं पेज ओपन होत असलं तरी युझर्सना इतरांचे ट्विटस दिसेनासे झाले आहेत आणि नवे ट्विट्स लोड होणंही बंद झालं आहे. गेल्या तासाभरापासून युझर्सना या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

दरम्यान, ट्विटरकडून अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसंच यामागचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 

Web Title: Twitter down for thousands of users around the world

टॅग्स :Twitterट्विटर