twitter blue tick blue tick wil be seen again on twitter next year know how to get | अरे व्वा! Twitter वर पुन्हा एकदा लवकरच मिळणार Blue Tick, जाणून घ्या कसं?

अरे व्वा! Twitter वर पुन्हा एकदा लवकरच मिळणार Blue Tick, जाणून घ्या कसं?

नवी दिल्ली - मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ट्विटर आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. अकाऊंटची सत्यता पडताळण्यासाठी वापरण्यात येत असलेलं 'ब्लू टिक'चं चिन्ह टि्वटर पुन्हा एकदा लवकरच परत आणणार आहे. ट्विटरने आपला पब्लिक व्हेरिफेकेशन प्रोग्राम तीन वर्षांपूर्वी काही कारणांमुळे बंद केला होता. मात्र आता ट्विटर परत ब्लू टिक (Blue Tick) आणण्याची योजना तयार करत आहे. 

2021 च्या सुरुवातीला ही व्हेरिफिकेशन प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. ज्या अंतर्गत सक्रिय (Active) आणि योग्य (authentic) युजर्सच्या अकाऊंट्सना 'ब्लू टिक' मिळू शकते. ट्विटरने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, "2020 मधील अमेरिकी निवडणुकीतील सार्वजनिक संवादांमध्ये विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी आम्ही एका वर्षानंतर हे काम पुढे सुरू ठेवले आहे."

ट्विटर 2021 च्या सुरुवातीला कंपनी आपला व्हेरिफिकेशन प्रोग्राम सुरू करणार आहे. यासाठी युजर्सना 24 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत याबाबत फीडबॅक द्यायला सांगितलं आहे. पॉलिसीच्या आधारेच भविष्यात सुधारणा करण्यात येणार आहेत. व्हेरिफिकेशनचा अर्थ काय? व्हेरिफिकेशनसाठी कोण योग्य आहेत? या गोष्टी असणार आहेत. 2021 पासून ही प्रक्रिया आम्ही सुरू करणार असून, या पॉलिसीमुळे 'ब्लू टिक' असलेले खाते हे सार्वजनिक हिताचे authentic अकाऊंट असणार आहे. 

ट्विटरकडून "या" प्रकारचे अकाऊंट केले जाऊ शकतात व्हेरिफाय 

'ब्लू टिक' मिळवण्यासाठी ट्विटरवरील अकाऊंट हे सक्रिय असणं अत्यंत गरजेचं आहे. या अंतर्गत ट्विटरकडून सहा प्रकारचे अकाऊंट व्हेरिफाय केले जाऊ शकतात. यामध्ये सरकारी अकाऊंट, कंपन्याचे अकाऊंट, ब्रँडचे ट्विटर हँडल, नॉन प्रॉफिट ऑर्गनायज़ेशन, न्यूज मीडिया ट्विटर अकाउंट्स, एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स, सामाजिक कार्यकर्ते, आयोजक आणि अन्य प्रभावशाली व्यक्ती यांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: twitter blue tick blue tick wil be seen again on twitter next year know how to get

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.