शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारतातही Twitter Blue ची आजपासून सुरुवात, दरमहा मोजावे लागणार ९०० रुपये! कसे जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 09:52 IST

मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरनं (Twitter) भारतातही आता सब्सक्रिप्शन सेवा सुरू केली आहे. भारतात Twitter Blue सेवेचे शुल्क ६५० रुपयांपासून सुरू होते.

नवी दिल्ली-मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरनं (Twitter) भारतातही आता सब्सक्रिप्शन सेवा सुरू केली आहे. भारतात Twitter Blue सेवेचे शुल्क ६५० रुपयांपासून सुरू होते. वेब युझर्सना 'ट्विटर ब्लू'साठी दरमहा ६५० रुपये, तर मोबाइल युझर्ससाठी दरमहा ९०० रुपये मोजावे लागणार आहेत. 

इलॉन मस्कनं गेल्या वर्षी ४४ बिलियन डॉलरमध्ये ट्विटर खरेदी केले. त्यानंतर मस्कनं ट्विटरमध्ये अनेक बदल केले. यातच ट्विटर ब्लू सेवेची घोषणा करण्यात आली होती. या सेवेअंतर्गत युझर्सना अतिरिक्त सेवेसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. 

ट्विटरनं याआधी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जपानसह इतर काही देशांमध्ये Twitter Blue सेवेची सुरुवात केली होती. या देशांमध्ये ट्विटर ब्लू सेवेसाठी ८ डॉलर प्रतिमहिना शुल्क आकारले जात आहे. वर्षभराचं सब्सक्रिप्शन घेतल्यास ८४ डॉलर खर्च करावे लागत आहेत. ट्विटर ३ डॉलर अतिरिक्त चार्ज आकारुन गुगलला कमीशन देणार आहे. 

आता भारतातही या सेवेची सुरुवात झाली आहे. ट्विटर ब्लू सेवा घेण्यासाठी वेब युझर्सना दरमहा ६५० रुपये तर मोबाइल यूझर्सना दरमहा ९०० रुपये चार्ज केले जाणार आहेत. तर वर्षभराचं सब्सक्रिप्शन घेतलं तर ६५०० रुपये भरावे लागणार आहेत. 

Twitte Blue मध्ये मिळणार कोणते फिचर्स- ट्विटर ब्लू सब्सक्रिप्सनसोबत यूझर्सना ब्लू टीकमार्क दिला जाणार आहे. यासोबतच यूझर्सना ट्विट एडिट करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसंच 1080p व्हिडिओ अपलोड करण्याच्या सुविधेसोबतच रीडर मोडचाही अॅक्सेस मिळणार आहे. - याशिवाय ट्विटर यूझर्सना नॉन पेड यूझर्सच्या तुलनेत कमी जाहिराती दिसतील. तसंच वेरिफाइड यूझर्सना ट्विटला रिप्लाय आणि ट्विटमध्येही प्राधान्य दिलं जाईल. - इतकंच नाही, तर या अंतर्गत यूझर्सना ट्विटसाठी ४ हजार अक्षरांची मर्यादा मिळणार आहे.  

टॅग्स :Twitterट्विटर