ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 16:36 IST2025-08-14T16:36:00+5:302025-08-14T16:36:47+5:30
मोबाईल फोनसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी उच्च दर्जाचे कव्हर ग्लास भारतातच बनविले जाणार आहेत. या वर्षीच्या अखेरीस डिसेंबरपासून ही कंपनी उत्पादन सुरु करणार आहे.

ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
अॅप्पल, टेस्लानंतर अमेरिकेची आणखी एका कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकी नितीला ठोकर देत भारतात येत असल्याची घोषणा केली आहे. भारत इनोव्हेटीव्र ग्लास टेक्नॉलॉजीजने (BIG Tech) भारतात येत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
अमेरिकेची ग्लास टेक्नॉलॉजी कंपनी कॉर्निंग आणि ऑप्टिमस इन्फ्राकॉमचा हा संयुक्त उपक्रम आहे. यामुळे मोबाईल फोनसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी उच्च दर्जाचे कव्हर ग्लास भारतातच बनविले जाणार आहेत. या वर्षीच्या अखेरीस डिसेंबरपासून ही कंपनी उत्पादन सुरु करणार आहे.
देशात स्क्रीन कव्हर ग्लासची मागणी वाढत आहे. यामुळे मोबाईल चांगला दिसतो आणि आदळण्या, खरचटण्यापासून वाचतो देखील. या कंपनीच्या प्रकल्पातून ही मागणी पूर्ण केली जाणार आहे. एवढेच नाही तर परदेशांतही या कंपनीची उत्पादने निर्यात केली जाणार आहेत.
मोबाईलची स्क्रीन खूप महागडी असते. ती फुटली तर तुमचा डेटा सर्व त्या फोनमध्ये अडकलेला राहतो. ती बदलून घेण्याचा खर्च हा अनेकदा त्या मोबाईलच्या त्यावेळच्या किंमतीएवढा किंवा जास्तही असतो. परंतू, डेटा आतमध्ये असल्याने बहुतांशवेळा तो मिळविण्यावाचून पर्याय नसतो. ही स्क्रीन वाचविण्यासाठी ज्या गोरिला ग्लास येतात त्या ही कंपनी बनविते. जवळपास सर्व मोबाईल फोनमध्ये असे ग्लास प्रोटेक्शन वापरले जाते.