शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

मोफत मिळणार Truecaller मधील फिचर; अ‍ॅपमध्ये आला मोठा अपडेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 5:10 PM

Truecaller नं अ‍ॅपचं नवीन व्हर्जन सादर केलं आहे. Truecaller 12 अपडेटमध्ये Android अ‍ॅपवर नवीन कॉल रेकॉर्डिंग फीचर जोडण्यात आलं आहे.  

Truecaller नं Android अ‍ॅपमध्ये नवीन कॉल रेकॉर्डिंग फीचर जोडलं आहे. तसेच कंपनीनं Truecaller 12 व्हर्जनच्या माध्यमातून अ‍ॅपचा युजर इंटरफेस देखील बदलला आहे. ज्यात कॉल आणि SMS साठी नवीन टॅब मिळतील. या बदलामुळे युजर अ‍ॅपच्या माध्यमातून वॉयस/व्हिडीओ कॉलिंग आणि मेसेज करणं सोपं होईल. पुढे आम्ही Truecaller मधील नवीन फीचर्सची माहिती दिली आहे.  

व्हिडीओ कॉलर आयडी (Video Caller ID) 

यात युजरला कॉल आल्यावर एक व्हिडीओ क्लिप मिळेल. या क्लिपमधून कॉल कोणी केला आहे ते समजेल. युजर स्वतःचा व्हिडीओ अपलोड करू शकतील किंवा टेम्पलेटमधील एक व्हिडीओ क्लिप आपली व्हिडीओ कॉलर आयडी (Video Caller ID) म्हणून सेट करू शकतील. ही व्हिडीओ कॉलर आयडी फोनबुक कॉन्टॅक्ट आणि वेरिफाइड बिजनेस कॉल्ससाठी देखील विजिबल असेल. 

वॉयस कॉल रेकॉर्डिंग (Voice Call Recording) 

याआधी फक्त प्रीमियम युजर्ससाठी असलेलं हे फिचर आता फ्री व्हर्जन युजरसाठी देखील उपलब्ध झालं आहे. परंतु यासाठी फोनमधील Android व्हर्जन 5.1 आणि त्यापेक्षा वरचं असायला हवं. या फीचरच्या माध्यमातून युजर कोणताही वॉयस कॉल रेकॉर्ड करू शकतील. यातील ऑटोमैटिक मोड आलेले किंवा केलेले सर्व कॉल रेकॉर्ड करून युजरच्या डिवाइसमध्ये ठेवतो. 

घोस्ट कॉल आणि कॉल अनाउंस (Ghost Call and Call Announce) 

हे फीचर सध्या Truecaller प्रीमियम युजरसाठी आलं आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर फेक कॉल सेट करू शकतील. नको असलेल्या लोकांसोबत अडकल्यास तुम्ही फेक कॉल शेड्युल करून त्या बहाण्याने तिथून निघू शकता. तर कॉल अनाउंस फीचर आलेल्या कॉलरचे कॉन्टॅक्टमधील नाव अनाउंस करेल.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान