शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ ते ३० भाजपा आमदार फोडण्याचं सगळं प्लॅनिंग ठरलं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
3
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
4
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
5
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
6
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
7
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
8
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
9
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
10
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
11
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
12
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
13
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
14
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
15
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
16
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
17
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
18
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
19
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
20
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम

व्हॉट्सअॅपवर आता डिलीट केलेले मेसेजही वाचता येणार, 'ही' आहे ट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 12:04 PM

व्हॉट्सअॅपवरील काही मेसेज हे कधी कधी आपण वाचण्याआधीच डिलीट केलेले असतात. युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. एका ट्रिकच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपवर आता डिलीट केलेले मेसेजही वाचता येणार आहेत.

ठळक मुद्देव्हॉट्सअॅपवर आता डिलीट केलेले मेसेजही वाचता येणार आहेत.गुगल प्ले स्टोरवरून Notification History हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. मित्राने अथवा मैत्रिणीने पाठवून डिलीट केलेला मेसेज वाचायचा असल्यास याचा फायदा होणार आहे. 

नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं लोकप्रिय मेसेजिंग अॅप असून ते नेहमीच युजर्सना नवनवीन फीचर्स देत असतं. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने लोकांना पाठवलेले मेसेज डिलीट करता येईल यासाठी एक खास फीचर आणलं होतं. Delete for everyone या फीचरच्या माध्यमातून सेंडर आणि रिसीव्हर या दोघांकडून मेसेज डिलीट केला जातो. मात्र व्हॉट्सअॅपवरील काही मेसेज हे कधी कधी आपण वाचण्याआधीच डिलीट केलेले असतात. त्यामुळे व्हॉट्सअॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. एका ट्रिकच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपवर आता डिलीट केलेले मेसेजही वाचता येणार आहेत. या ट्रिकबाबत जाणून घेऊया. 

Delete for everyone या फीचरमध्ये व्हॉट्सअॅपवर एखादा मेसेज पाठवल्यानंतर जवळपास 1.30 तासाच्या आत तो मेसेज डिलीट करता येतो. त्यानंतर मेसेज डिलीट केल्यास तो तसाच राहतो. मात्र आता ट्रिकच्या मदतीने डिलीट केलेले मेसेज युजर्सना वाचता येणार आहेत. यासाठी सर्वात आधी गुगल प्ले स्टोरवरून Notification History हे अॅप डाऊनलोड करावे लागेल. जर व्हॉट्सअॅपवर एखादा मेसेज आला तर या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला त्याबाबत नोटीफिकेशन मिळेल. लॉग फॉर्मेटमध्ये हे मेसेज दिसतील. मात्र यासाठी सुरुवातीला सेटींगमध्ये जाऊन अक्सेस देण्याची गरज आहे. 

लॉगवर क्लिक करून तुम्ही तो मेसेज वाचू शकता. मात्र जर मेसेज खूपच मोठा असेल तर तो पूर्ण दिसणार नाही. मोठा मेसेज दिसला नाही तरी त्याचा विषय मात्र यामुळे समजू शकणार आहे. व्हॉट्सअॅपवर कधी कधी एखाद्या व्यक्तीला मेसेज पाठवला जातो. मात्र थोड्यावेळाने काही कारणास्तव तो डिलीट केला जातो. त्यावेळी तो मेसेज काय असेल याबाबत अनेकांना उत्सुकता असते. त्यामुळेच जर तुमच्या एखाद्या मित्राने अथवा मैत्रिणीने पाठवून डिलीट केलेला मेसेज वाचायचा असल्यास याचा खूप फायदा होणार आहे.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान