या कंपनीला AI वरील अहवाल देणे महागात पडले; ऑस्ट्रेलियाला द्यावा लागला भरमसाठ दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 16:51 IST2025-10-08T16:43:08+5:302025-10-08T16:51:14+5:30
अहवालात बनावट शैक्षणिक संदर्भ आणि अगदी बनावट न्यायालयीन खटल्याचा समावेश होता. सिडनी विद्यापीठातील संशोधक डॉ. क्रिस्टोफर रझ म्हणाले की, एआयने अचूक माहितीशिवाय उत्तरे तयार केली.

या कंपनीला AI वरील अहवाल देणे महागात पडले; ऑस्ट्रेलियाला द्यावा लागला भरमसाठ दंड
सध्या एआय वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. प्रत्येक कामात चॅटजीपीटी आणि एआय वापरली जाते. पण, एका कंपनीला चॅटजीपीटी वापरणे महागात पडले आहे. ही लंडनस्थित बहुराष्ट्रीय कंपनी डेलॉइट आहे. या कंपनीने एआयचा वापर करणे महागात पडले आहे. कंपनीने ऑस्ट्रेलियन सरकारसाठी एक अहवाल तयार केला होता, परंतु त्यात अनेक चुका आढळून आल्या. अहवालात असे तथ्य देखील नमूद केले होते जे प्रत्यक्षात अस्तित्वात नव्हते. कंपनीने आपली चूक मान्य केली आहे आणि त्यांना देयकाचा एक भाग परत करावा लागेल. या चुकीमुळे डेलॉइटला अंदाजे ४.४ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स किंवा अंदाजे २.६ कोटींचे नुकसान झाले आहे.
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रिपदाबाबतही एकमत नाही
मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२४ मध्ये, ऑस्ट्रेलियन सरकारने डेलॉइटला देशाच्या टार्गेटेड कम्प्लायन्स फ्रेमवर्क आणि त्याच्या आयटी सिस्टीमचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केले. सात महिन्यांनंतर, जुलै २०२५ मध्ये, कंपनीने आपला अहवाल सादर केला, यामध्ये तांत्रिक दोषांसह अनेक कमतरता आढळल्या.
पुढच्या महिन्यात, ऑगस्टमध्ये, द ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने अहवालात अनेक गंभीर चुका नोंदवल्या, यामध्ये बनावट शैक्षणिक संदर्भ आणि बनावट न्यायालयीन खटला यांचा समावेश होता. सिडनी विद्यापीठातील संशोधक डॉ. क्रिस्टोफर रझ म्हणाले की, एआयने अचूक माहितीशिवाय स्वतःची उत्तरे तयार केली आहेत. एक खोटा संदर्भ दुरुस्त करण्याऐवजी, अहवालात आणखी अनेक त्रुटींचा समावेश करण्यात आल्या आहेत.
टीकेनंतर, डेलॉइटने अहवालात सुधारणा केली. आणखी एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला. त्यांनी १२ हून अधिक खोटे संदर्भ काढून टाकले आणि इतर चुका दुरुस्त केल्या. या अहवालात, कंपनीने कबूल केले की त्यांनी अहवाल तयार करण्यासाठी Azure OpenAI GPT-4o नावाचे AI वापरले आहे.