Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 14:02 IST2025-06-25T13:53:23+5:302025-06-25T14:02:16+5:30

Google Chrome updates: तंत्रज्ञानाच्या जगात एक महत्त्वाचा बदल घडणार आहे.

These Android devices will no longer get Google Chrome updates soon | Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!

Google Chrome: डाउनलोड करणं दूरच राहिलं, साधं सर्चही करता येणार नाही; 'या' फोन वापरकर्त्यांना इशारा!

तंत्रज्ञानाच्या जगात एक महत्त्वाचा बदल घडणार आहे. लोकप्रिय ब्राउझर गुगल क्रोम येत्या ५ ऑगस्ट २०२५ पासून अँड्रॉइड ८.० ओरियो आणि अँड्रॉइड ९.० पाई ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करणे थांबवेल, अशी कंपनीने घोषणा केली. गुगलचा हा निर्णय अनेक स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. कारण त्यांना आता नवीन क्रोम अपडेट्स मिळणार नाहीत. क्रोमला आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेसह अपडेट ठेवण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे गुगलचे म्हणणे आहे.

गुगलच्या मते, क्रोमची आवृत्ती १३८ ही अँड्रॉइड ८.० आणि ९.० वरील अंतिम आवृत्ती असेल, जी ५ ऑगस्ट २०२५ नंतर सपोर्ट बंद होईल. क्रोम सपोर्ट मॅनेजर एलेन टी. यांनी असे म्हटले आहे की, जुन्या फोनमध्ये सुरक्षा पॅच किंवा नवीन फीचर्स मिळणार नाहीत. जुन्या सिस्टमवर आधुनिक सुरक्षा आणि परफॉरमेंस स्टैंडर्ड्स राखणे कठीण होत असल्याने हा बदल करण्यात आला, अशीही त्यांनी माहिती दिली.

हा बदल अँड्रॉइड १० किंवा त्याहून जुन्या आवृत्तीवर चालणाऱ्या फोनवर परिणाम करेल, ज्यात सॅमसंग गॅलेक्सी एस९, शाओमी रेडमी नोट ५ आणि इतर २०१७-२०१८ मधील अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. भारतात मोठ्या प्रमाणात जुन्या फोनचा वापर केला जातो, त्यांच्यासाठी हा निर्णय आव्हानात्मक असू शकतो. क्रोम आवृत्ती १३८ काम करेल. पण हे सुरक्षा अपडेट्सशिवाय दिर्घकालीन वापरासाठी सुरक्षित नाही. त्यामुळे गुगलने वापरकर्त्यांना नवीन अँड्ऱॉईड फोन खरेदी करण्याचा सल्ला दिला. पण काही लोकांसाठी हे शक्य नसल्याने त्यांच्यासमोर काही पर्याय ठेवण्यात आले. वापरकर्ते फायरफॉक्स, मायक्रोसॉफ्ट एज अशा ब्राउझरचा वापर करु शकतात. 

जुन्या स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी शेवटचा पर्याय
फायरफॉक्स: हा ब्राउझर अँड्रॉइड ५.० आणि त्यावरील आवृत्तीला सपोर्ट करतो आणि सुरक्षा अपडेट्स देतो.
मायक्रोसॉफ्ट एज: हे जुन्या डिव्हाइसवर देखील काम करू शकते आणि नियमित अपडेट्स मिळतात.

Web Title: These Android devices will no longer get Google Chrome updates soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.