देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 20:18 IST2025-06-19T20:17:36+5:302025-06-19T20:18:03+5:30

काहीजण म्हणतील सोनीचा टीव्ही घेऊ, तो देखील तेवढ्याच किंमतीत मिळतो. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की टीव्ही ३० लाखांनाही मिळतो, तर तुमचा विश्वास बसेल का...

The country's most expensive TV was sold for 3 million; TCL X955 Max TV WORLDS largest tv | देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

तुम्ही फारफारतर किती हजारांचा, किती लाखांचा टीव्ही घ्याल... ओएलईडी टीव्ही जास्तीतजास्त दीड दोन लाखांना मिळतो. काहीजण म्हणतील सोनीचा टीव्ही घेऊ, तो देखील तेवढ्याच किंमतीत मिळतो. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की टीव्ही ३० लाखांनाही मिळतो, तर तुमचा विश्वास बसेल का...

टीव्ही ३० हजारांनाही मिळतो आणि ३० लाखांनाही... फ्लिपकार्टने नुकताच भारतातील सर्वात महागडा टीव्ही विकला आहे. TCL या कंपनीचा तब्बल 115-इंचाचा X955 Max TV हा टीव्ही ३० लाखांना विकला देखील गेला आहे. या टीव्हीची साईज ही एका भिंतीएवढी आहे. 

TCL X955 Max TV हा टीव्ही जगातील सर्वात मोठा QD-Mini LED TV आहे. यामध्ये 4K Ultra HD रिझोल्यूशन मिळते. या टीव्हीला १२ स्पीकर देण्यात आले आहेत. म्हणजे आवाजही याचा दणकून असणार आहे. हा एवढा मोठा टिव्ही आहे की तुम्हाला थिएटरमध्येच बसल्यासारखे वाटणार आहे. 

काय आहेत फिचर्स पाहुयात...
या टीव्हीमध्ये डॉल्बी व्हिजन, ओन्क्यो ६.२.२ हाय-फाय सिस्टम, १२ स्पीकर्स, १२० वॅट आउटपुट तसेच डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे. गेमिंगसाठी १४४ हर्ट्ज रिफ्रेश रेट, फ्री सिंक प्रीमियम प्रो आणि गेम मास्टर टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. ब्राइटनेस ५००० निट्स आहे. याशिवाय २०,०००+ लोकल डिमिंग झोन, ९८% DCI-P3 कलर कव्हरेज देण्यात आले आहे. TCL AiPQ प्रो प्रोसेसर देण्यात आला असून तो एआय आधारित रंग, कॉन्ट्रास्ट आणि स्पष्टता देतो. ३ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज यामध्ये देण्यात आले आहे. 

Web Title: The country's most expensive TV was sold for 3 million; TCL X955 Max TV WORLDS largest tv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.