शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

Tecno नं भारतात लाँच केला स्वस्त स्मार्टफोन; किंमत ९ हजारांपेक्षाही कमी असण्याची शक्यता, पाहा फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 7:29 PM

काही दिवसांपूर्वी कंपनीनं लाँच केला होता Tecno Spark 7 स्मार्टफोन. नाईट मोड, स्टिरिओ साऊंडसह आहेत जबरदस्त फीचर्स

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी कंपनीनं लाँच केला होता Tecno Spark 7 स्मार्टफोन.नाईट मोड, स्टिरिओ साऊंडसह आहेत जबरदस्त फीचर्स

Tecno या कंपनीनं नुकताच आपला स्मार्टफोन Tecno Spark 7 लाँच केला होता. त्यानंतर आज अचानक कंपनीनं आपला Tecno Spark 7P हा स्मार्टफोन लाँच केला. 90Hz डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेऱ्यासह कंपनीनं हा स्मार्टफोन लाँच केला. या स्मार्टफोनसोबत कंपनीनं दमदार बॅटरीही दिली आहे. Tecno Spark 7P मध्ये सुपर नाईट मोड आणि डिरॉक स्टिरिओ साऊंड इफेक्टसारखे फीचर्सही देण्यात आले आहेत. Tecno Spark 7P ची किंमत Tecno Spark 7 च्या जवळपाच म्हणजे ९ हजारांच्या दरम्यान असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Tecno Spark 7 ची किंमत 8,499 आणि 7,499 इतकी आहे. Tecno Spark 7P हा स्मार्टफोन कंपनीनं वेबसाईटवर दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच केला आहे.  64GB आणि 128GB व्हेरिअंटमध्ये हा स्मार्टफोन लाँच झाला आहे. तर दुसरीकडे Tecno Spark 7P हा स्मार्टफोन चार कलर व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये आल्प्स ब्लू, मॅग्नेट ब्लॅक, स्पुस ग्रीन आणि समर मोजिटो या कलर्सचा समावेश आहे. काय आहेत स्पेसिफिकेशन्स?Tecno Spark 7P हा स्मार्टफोन अँड्रॉईड 11 वर आधारित HiOS 7.5 वर चालतो. यामध्ये 6.8 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यात MediaTek Helio G70 SoC प्रेसेसर देण्यात आला आहे. तसंच यात मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून 8 मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरा सेन्सरही आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची जबरदस्त बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हीटीसाठी यात 4G LTE, वायफाय, ब्ल्यूटूथ, जीपीएस/ए-जीपीएस, मायक्रो युएसबी, 3.5mm हेडफोन जॅकही देण्यात आलाय. याशिवाय मागील बाजून फिंगर प्रिन्ट सेन्सरही देण्यात आला आहे. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान