शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

खूशखबर! WhatsApp वर लवकरच 'हे' दमदार फीचर्स येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 10:59 AM

इन्संट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपवरचे अनेक फीचर हे युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर असतात.

नवी दिल्ली - इन्संट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपवरचे अनेक फीचर हे युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर असतात. फेक न्यूज आणि अफवांपासून वाचण्यासाठी अनेक फीचर मदत करत असतात. व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी खूशखबर आहे कारण लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर तीन नवीन दमदार फीचर येणार आहेत. 

WhatsApp Frequently Forwarded

व्हॉट्सअ‍ॅप फ्रिक्वेंटली फॉरवर्डेड फीचरच्या मदतीने युजर्सना फॉरवर्डेड मेसेजची माहिती मिळणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर आधीपासून फॉरवर्ड मेसेजचं लेबल दाखवलं जातं. मात्र त्यावेळी Single Arrow दाखवला जातो. मात्र आता या फीचरच्या मदतीन पाच पेक्षा अधिक वेळा फॉरवर्ड केलेला मेसेज आला तर Double arrow दाखवला जाईल. अ‍ॅन्ड्रॉईड आणि आयफोन या दोन्ही युजर्सना याचा फायदा होणार आहे. 

फोटो सेंड करताना चूक होणार नाही

व्हॉट्स्अ‍ॅपवर फोटो पाठवणं या फीचरच्या मदतीने सोपं होणार आहे. फोटो पाठवताना उजव्या बाजूला खालच्या दिशेला ज्या व्यक्तीला आपण फोटो पाठवणार आहोत. त्याचं नाव दिसणार आहे. तसेच त्याचा प्रोफाईल फोटो देखील दिसेल. 

Hide Muted Status

अ‍ॅन्ड्रॉईड अपडेट 2.18.183 मध्ये युजर्सना म्यूट केलेले अपडेट्स हाइड करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. याआधी म्यूट केलेले स्टेटस युजर्सना स्टेटस लिस्टमध्ये सर्वात खाली दिसत होते. मात्र आता ते पाहता येणार आहेत. त्यासाठी नवा पर्याय देण्यात येणार असून तो युजर्ससाठी फायदेशीर आहे. 

WhatsApp मेसेजचा कंटाळा आलाय? अकाऊंट डिलीट न करता व्हा 'Invisible'

Whatsapp वर असा बनवा 'सीक्रेट ग्रुप'व्हॉट्सअ‍ॅपवर काही फोटो किंवा व्हिडीओ हे युजर्सना दुसऱ्यांना सेंड करायचे नसतात. तर स्वत: कडेच ठेवायचे असतात. यासाठी एक खास ट्रिक आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर एक सीक्रेट ग्रुप तयार करून पर्सनल फोटो, व्हिडीओ, महत्त्वाच्या लिंक आणि डॉक्यूमेंट सुरक्षित ठेवता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर आपला सीक्रेट ग्रुप तयार करण्यासाठी काही मिनिटांसाठी कोणत्यातरी एका मित्राला आपल्या या नव्या ग्रुममध्ये सामील करावं लागेल. तुम्हाला हव्या असलेल्या नावाने एक नवा ग्रुप तयार करा. काही मिनिटांसाठी त्यामध्ये आपल्या एका मित्राला अ‍ॅड करा. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या ग्रुप इंफोमध्ये जा. यासाठी ग्रुपच्या वर देण्यात आलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. त्यामध्ये गेल्यावर आपल्या मित्राला त्या ग्रुपमधून रिमूव्ह करा. त्यानंतर त्या ग्रुपमध्ये केवळ तुम्हीच राहाल. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅपवरचा तुमचा सीक्रेट ग्रुप तयार झाला आहे. यामध्ये तुम्ही एकटेच असल्याने तुम्हाला हवे असलेले फोटो आणि इतर काही महत्त्वाच्या गोष्टी सुरक्षित आहेत. 

WhatsApp स्टेटसला फेसबुक स्टोरी बनवायचंय? मग 'या' स्टेप्स करतील मदत 

Whatsapp वरचं खास चॅट लपवायचंय? कसं ते जाणून घ्याव्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपवरीस काही चॅट्स हे खास असतात. ते कोणी पाहू नये असं नेहमी युजर्सना वाटत असतं. आयफोन युजर्सना चॅट लपवण्याची सुविधा ही देण्यात आली आहे. मात्र आता अँन्ड्रॉईड युजर्सना देखील चॅट लपवता येणार आहे. यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. चॅट स्क्रिनमध्ये तुम्हाला हवं असलेलं चॅट टॅप करा आणि प्रेस करा. आर्काइव्ह करायचं आहे त्या चॅटवर क्लिक करा. त्यानंतर आर्काइव्ह आयकॉन सिलेक्ट करा. चॅट आर्काइव्ह झाल्यानंतर नॉर्मल स्क्रिनवर ते दिसणार नाही. आर्काइव्ह चॅट्स हे चॅट स्क्रिनच्या खाली जाऊन अ‍ॅक्सेस करता येतं.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान