Technology: Incognito Mode वापरुनही लिक होऊ शकते माहिती; का? ते जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 16:49 IST2025-03-25T16:48:02+5:302025-03-25T16:49:18+5:30
Technology: अनेकजण सामान्य ब्राउझरऐवजी Incognito चा वापर करतात, त्याचा नेमका फायदा काय आणि त्यामुळे होणारे नुकसान काय त्याबद्दल जाणून घेऊ.

Technology: Incognito Mode वापरुनही लिक होऊ शकते माहिती; का? ते जाणून घ्या!
तरुणांचे फोन बघा, सतत डार्क मोड ऑन असतो आणि सर्फिंगच्या वेळी Incognito Mode सुरु असतो. डार्क मोड मुळे डोळ्यांना त्रास कमी होतो, बॅटरी लवकर उतरत नाही, पण Incognito Mode वापरण्यामागे कारण काय? याबाबत तुम्हीदेखील उत्सुक असाल तर दिलेली माहिती शेवट्पर्यंत वाचा.
वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची जशी सकारात्मक बाजू आहे तशी नकारात्मक बाजूदेखील आहे आणि ती म्हणजे डेटा लीक होणे. होय, आपण जे काही विचार करतो आणि इंटरनेटवर शोधतो. ते पुढच्याच मिनिटापासून वेगवेगळ्या जाहिराती आणि लिंक्सच्या रूपात आपल्यासमोर दिसू लागते. यामुळेच आजच्या डिजिटल युगात प्रायव्हसी ही एक मोठी समस्या बनली आहे. ही गोपनीयता कोणत्याही बाबतीत असू शकते. तो खाजगी ठेवण्याचा उपाय म्हणजे Incognito Mode आणि म्हणूनच मुख्यत्त्वे तरुणांची असते त्याला अधिक पसंती!
काय आहे हे Incognito?
इंटरनेटवर काहीही शोधण्यासाठी आपण वेब ब्राउझर वापरतो. डीफॉल्टनुसार गुगलसारखे एखादे वेब ब्राउझर आपण उघडतो आणि त्यावर सर्च करतो. तिथे आपसुख आपली सर्च हिस्ट्री जमा होते. मात्र त्या ब्राऊजरवर कोपऱ्यात असलेल्या तीन ठिपके क्लिक केले, की Incognito Mode असा ऑप्शन दिसतो. तो क्लिक केला असता मोबाईल स्क्रीन डार्क मोडवर जाते आणि तिथे सर्च केल्यावर हिस्ट्री जमा होत नाही. गुगल क्रोममधील या फीचरला इनकॉग्निटो मोड असे नाव देण्यात आले आहे. हे मायक्रोसॉफ्ट मध्ये इनप्राइव्हेट मोड आणि सफारीमध्ये प्रायव्हेट ब्राउझिंग म्हणून ओळखले जाते.
Incognito Mode कसे काम करते?
Incognito Mode वापरणे कठीण नाही, यासाठी तुम्ही प्रथम वेब ब्राउझर उघडा (उदाहरणार्थ -गुगल)
वेब ब्राउझरच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात तीन उभे ठिपके दिसतील, त्यावर क्लिक करा आणि नवीन Incognito Mode विंडो हा पर्याय निवडा.
तो निवडल्यानंतर, एक नवीन विंडो उघडेल, जिथे आपण इंटरनेटवर शोधू शकता.
Incognito Mode वर देखील जतन केला जातो!
काही ठिकाणी Incognito Mode वर देखील सर्च हिस्ट्री जमा होते. ती दिलीत करण्यासाठी Incognito Mode मधून पुढील सेटिंगकरा .
प्रथम ब्राउझरवर जा, तेथे 'Google My Activity' उघडा. आता Delete Activity by वर क्लिक करा आणि नंतर All Time निवडा. शेवटी सर्च हिस्ट्री डिलीट बटण दाबा यानंतर, तुम्ही Google च्या ब्राउझिंग डेटावर जाऊन कुकीज आणि कॅशे फाइल्स देखील डिलीट करू शकता.
ब्राउझरवरील सर्च हिस्ट्री डिलीट केल्यानंतर फोनच्या सेटिंगमध्ये जा. तेथे कनेक्शन किंवा Wi-Fi आणि इंटरनेट वर जा. येथे खाजगी DNS पर्यायावर क्लिक करा आणि ते स्वयंचलित वरून बंद करा. आता फोन रीस्टार्ट करा.
तथापि, या सर्व स्टेप फॉलो केल्यानंतरही काही डेटा कंपनीकडे जतन केला जातो, जो रद्द करणे सोपे नाही. ही व्यवस्था अशा अपराध्यांसाठी आहे, जे गैरव्यवहार किंवा फ्रॉड करतात. पोलिसांना ही हिस्ट्री तपासणे सोपे जावे, म्हणून ती सोय ठेवली आहे.