शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

छोट्या दोस्तांनाही करता येणार धमाल! लहान मुलांसाठी Instagram चं नवं व्हर्जन; जाणून घ्या, काय असणार खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 14:52 IST

Instagram News : विशेषत: 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी हे अ‍ॅप असणार आहे.

नवी दिल्ली : फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) लहान मुलांसाठी नवीन अ‍ॅप लाँच करणार आहेत. हे अ‍ॅप सध्याच्या इन्स्टाग्रामची एक नवीन व्हर्जन असेल. विशेषत: 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी हे अ‍ॅप असणार आहे. इन्स्टाग्राम प्रॉडक्टचे उपाध्यक्ष विशाल शाह यांनी BuzzFeed ला दिलेल्या मुलाखतीत याबाबतची माहिती दिली आहे. शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामचे दोन व्हर्जन असतील. एक व्हर्जन 13 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी असेल. तर दुसरं व्हर्जन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी असेल. लहान मुलं या सेफ मोडमध्ये इन्स्टाग्रामचा वापर करू शकणार आहेत. 

सध्याचे इन्स्टाग्रामची पॉलिसी 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना इन्स्टाग्राम वापरण्याची परवानगी देत ​​नाही. तसेच, मुलं त्यांचे पालक आणि व्यवस्थापकांच्या देखरेखीखाली इन्स्टाग्राम वापरू शकतात. BuzzFeed च्या रिपोर्टनुसार, किड्स फोक्स्ड Instagram व्हर्जनचे काम Instagram चे प्रमुख Adam Mosseri पाहतील. त्याचे नेतृत्व फेसबुकचे उपाध्यक्ष Pavni Diwanji करणार आहेत, त्यांनीच यापूर्वी युट्यूब किड्सचे नेतृत्व केले होते. हे Google च्या सब्सिडियरीचे चाइल्ड फोकस्ड प्रोडक्ट आहे.

Instagram कडून महिलांसाठी खास सोशल मीडिया सेफ्टी टिप्स, असं ठेवा अकाऊंट सेफ

फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलांवर वाढत्या गुन्ह्यांच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत. या प्लॅटफॉर्मवर मुलांशी संबंधित आक्षेपार्ह पोस्ट असल्याचा आरोप आहे. यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कंटेंट काढून टाकण्यासाठी दबाव वाढला होता. यूके आधारित नॅशनल सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ क्रूएल्टी टू चिल्ड्रनच्या (National Society for the Prevention of Cruelty to Children) रिपोर्टनुसार, इन्स्टाग्रामवर मुलांशी संबंधित सर्वाधिक केसेस आढळले आहेत. गेल्या तीन वर्षात यात लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुलांसाठी स्वतंत्र अ‍ॅप्स तयार करण्याचा दबाव वाढला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

WhatsApp कॉल रेकॉर्ड करायचाय? Android आणि iPhone मध्ये यासाठी नेमकं काय करायचं, जाणून घ्या

स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेकदा महत्त्वाचे कॉल हे फोनमध्ये रेकॉर्ड केले जातात. फोनमध्ये ती सुविधा देण्यात आलेली असते. हल्ली व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम झालं आहे. फक्त मेसेजिंग नाही तर व्हिडीओ कॉलिंग आणि व्हाईस कॉलिंगसाठी देखील हमखास व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हा केला जातो. मात्र व्हॉट्सअ‍ॅपमध्ये युजर्ना कॉल रेकॉर्ड करता येत नाही. तशी सुविधाच नाही. पण आता काळजी करू नका, युजर्ससाठी एक खूशखबर आहे. व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करण्याच्या काही पद्धती आहेत. अँड्रॉईड आणि आयफोन या दोन्हींमध्ये व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करण्याची पद्धत वेगवेगळी आहे.

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामtechnologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकSmartphoneस्मार्टफोन