पैसे घ्या, नोकरी सोडा; Google ने कर्मचाऱ्यांना दिली Buyout ऑफर, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 14:31 IST2025-06-12T14:30:54+5:302025-06-12T14:31:06+5:30

गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यासाठी मोठी रक्कम देत आहे.

Take the money, quit the job; Google gave buyout offer to employees, why? | पैसे घ्या, नोकरी सोडा; Google ने कर्मचाऱ्यांना दिली Buyout ऑफर, कारण काय..?

पैसे घ्या, नोकरी सोडा; Google ने कर्मचाऱ्यांना दिली Buyout ऑफर, कारण काय..?

अमेरिकन टेक जायंट Google आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या सतत कमी करत आहे. कंपनीने २०२३ मध्ये १२,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. आता कंपनीने कर्चारी कपात करण्यासाठी एक नवीन योजना आणली आहे. गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यासाठी मोठी रक्कम देत आहे. ज्या विभागांसाठी ही ऑफर आहे, त्यात नॉलेज अँड इन्फॉर्मेशन, सेंट्रल इंजिनिअरिंग, मार्केटिंग, रिसर्च अँड कम्युनिकेशन यांचा समावेश आहे. 

२०२३ पासून कर्मचाऱ्यांची संख्या सतत कपात
सीएनबीसीच्या अहवालानुसार, गुगलने २०२३ मध्ये १२,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले. तेव्हापासून, कंपनी कर्मचाऱ्यांची संख्या सतत कमी करत आहे. आता या नवीन ऑफर अंतर्गत किती कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले जाईल, याबद्दल कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही.

कॉस्ट कटिंग कंपनीच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक 
गुगलने पुष्टी केली आहे की, त्यांची बायआउट ऑफर, म्हणजेच ''Voluntary Exit Program'' फक्त अमेरिकन कर्मचाऱ्यांना लागू असेल. ही ऑफर अशा वेळी आली आहे, जेव्हा कंपनीचे वित्त प्रमुख अनत अश्केनाझी यांनी ऑक्टोबरमध्ये सांगितले होते की, खर्चात कपात करणे, हे कंपनीच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक आहे. दरम्यान, गुगल २०२५ मध्ये Ai पायाभूत सुविधांवर खर्च वाढवत आहे. त्यामुळेच नोकर कपात केल्याचे बोलले जात आहे.

चांगली कामगिरी नसलेल्या कर्मचाऱ्यांना धोका
गुगलच्या नॉलेज अँड इंफॉर्मेशन डिपार्टमेंट विभागात सुमारे २०,००० कर्मचारी आहेत. ऑक्टोबरमध्ये या युनिटची पुनर्रचना करण्यात आली, ज्याचे नेतृत्व गुगलचे कार्यकारी निक फॉक्स करत होते. फॉक्सने मंगळवारी एक मेमो पाठवला ज्यामध्ये म्हटले होते की, जे कर्मचारी कंपनीच्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत, ते काम सोडू शकतात. जे कर्मचारी त्यांच्या कामाबद्दल उत्साहित आहेत आणि चांगले काम करत आहेत, त्यांनीच कंपनीत राहावे. 

ऑफिसला या, अन्यथा काम सोडा
वर्क फ्रॉम होमबद्दलही कंपनीने कठोर भूमिका घेतली आहे. कंपनीने काही विभागातील कर्मचाऱ्यांना ऑफिसला येण्यास सांगितले आहे. गुगलने नवीन वर्क फ्रॉम ऑफिस धोरण लागू केले आहे. अतिमहत्त्वाचा विभाग, मार्केटिंग, संशोधन, ज्ञान आणि माहिती आणि संवाद या विभागातील कर्मचाऱ्यांना कंपनीने ऑफिसला येण्यास सांगितले आहे. कंपनीने हे धोरण अमेरिकेतली कार्यालयांसाठी लागू केले आहे. जे कर्मचारी घरून काम करतात, पण कार्यालयापासून ८० किमी अंतराच्या आत राहतात. त्यांनी कार्यालयात येण्यास सुरूवात करावी असे सांगितले आहे.

Web Title: Take the money, quit the job; Google gave buyout offer to employees, why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.