मस्तच! 'या' स्मार्टफोनची बॅटरी आठवडाभर चालणार; चार्जिंगची कटकट वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 12:57 PM2019-10-09T12:57:40+5:302019-10-09T12:59:00+5:30

तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी तुमचा मूड ठरवते असे नुकतेच एका अभ्यासामध्ये समोर आले आहे.

Sharp S7 announced in Japan with 1 week battery life | मस्तच! 'या' स्मार्टफोनची बॅटरी आठवडाभर चालणार; चार्जिंगची कटकट वाचणार

मस्तच! 'या' स्मार्टफोनची बॅटरी आठवडाभर चालणार; चार्जिंगची कटकट वाचणार

Next

नवी दिल्ली : तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी तुमचा मूड ठरवते असे नुकतेच एका अभ्यासामध्ये समोर आले आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर बॅटरी संपत येईपर्यंत पुन्हा आपण घरी पोहोचू की अन्य कुठे चार्जिंग करता येईल, याचे विचार मनात घोऴत असतात. आता तर चांगली बॅटरी लाईफ देणारे मोबाईलची मागणी होत आहे. म्हणूनच जपानची ही कंपनी चक्क आठवडाभर चालणारा स्मार्टफोन आणणार आहे. 


टीव्हीमुळे ऐकिवात असलेली कंपनी Sharp ने याची घोषणा केली आहे. Sharp S7 लाँच करण्यात येणार आहे. हा फोन Sharp Aquos Sense 3 Lite चे पुढील व्हर्जन असणार आहे. Sharp S7 हा फोन एकदा चार्जिंग केल्यावर 7 दिवसांची बॅटरी लाईफ देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामध्ये 4 हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. नुकताच हा फोन जपानमध्ये दाखविण्यात आला. येत्या डिसेंबरमध्ये हा फोन लाँच होणार आहे. 


peach, silver आणि gray अशा तीन रंगांत हा फोन मिळणार आहे. Gizmochina वर दिलेल्या माहितीनुसार या फोनचे वजन 167 ग्रॅम आहे. अँड्रॉईड वन ऑपरेटिंग सिस्टिम असणार असून 5.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनचे रिझोल्युशन 2160 x 1080 पिक्सल आहे. 


या फोनची बॅटरी दीर्घकाळ टिकण्यासाठी IGZO LCD energy-saving तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामुळे बॅटरी तब्बल 7 दिवस म्हणजे 168 तास चालू राहणार आहे. Snapdragon 630 प्रोसेसर, 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. पाठिमागे 12 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. 

Web Title: Sharp S7 announced in Japan with 1 week battery life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.