send your location to anyone without internet follow this trick | भारीच! इंटरनेटशिवाय आता पाठवता येणार Location; जाणून घ्या नेमकं कसं?

भारीच! इंटरनेटशिवाय आता पाठवता येणार Location; जाणून घ्या नेमकं कसं?

नवी दिल्ली - एखाद्या नव्या ठिकाणी जायचं असल्यास त्या लोकेशनबाबत फारशी माहिती नसते. अशावेळी हमखास इंटरनेटची मदत घेतली जाते. ते ठिकाण सर्च करून त्याबाबत माहिती मिळवली जाते. मात्र अनेकदा नेटवर्कची समस्या उद्भवते. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही. अशावेळी आपलं लोकेशन हे नातेवाईक अथवा मित्र परिवारासोबत शेअर करता येत नाही. मात्र आता एक खूशखबर आहे. इंटरनेट शिवायही आपलं लोकेशन दुसऱ्या व्यक्तीसोबत शेअर करता येऊ शकतं.

स्मार्टफोनमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यासही लोकेशन पाठवता येईल. यासाठी सर्वप्रथम फोनमध्ये गुगल मॅप ओपन करा. त्यानंतर युजरला गुगल मॅपवर आपलं लोकेशन जाणून घ्यावं लागेल. त्यासाठी कॉलनीचं नाव, ब्लॉक आणि आसपासच्या लँडमार्कची मदत घेता येईल. त्यानंतर गुगल मॅपवर दाखवल्या जात असलेल्या, आसपासच्या लँडमार्कवर पोहचा. त्या जागेवर काही वेळ टच करून ठेवा. त्यानंतर त्या लोकेशनवर रेड डॉट येईल. फोनच्या स्क्रीनवर खालच्या बाजूला तीन पर्याय दिसतील. पहिला डायरेक्शन, दुसरा शेअर आणि तिसरा सेव्ह.

लोकेशन शेअर करण्यासाठी इंटरनेटची नाही गरज, "ही" सोपी ट्रिक करेल मदत

लोकेशन शेअर करण्यासाठी तिसऱ्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर टेक्स्ट मेसेजचा पर्याय निवडा. आता ते लोकेशन तुम्ही कोणासोबतही शेअर करू शकता. त्याशिवाय गुगल मॅपमध्ये लाल रंगाचा डॉट आल्यानंतर, खालच्या बाजूला दिलेल्या डायरेक्शनचाही वापर करू शकता. गुगल मॅप फक्त त्याच ठिकाणांपर्यंत पोहचण्याचा रस्ता दाखवतो, जे गुगल मॅपमध्ये आधीपासूनच सेव्ह आहे हे लक्षात ठेवा. 

SMS ने पाठवा लोकेशन 

SMS द्वारे लोकेशन पाठवण्यासाठी आरसीएस सर्व्हिस अर्थात रिच कम्यूनिकेशन सर्विसेस उपलब्ध आहे. याअंतर्गत SMS द्वारे दुसऱ्या युजरला मल्टीमीडिया कंटेंट शेयरिंगद्वारे लोकेशन पाठवता येतात. त्यामुळेच इंटरनेटशिवाय देखील लोकेशन पाठवणं सहज शक्य होतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

स्मार्टफोन अलर्ट! "हे" 7 अ‍ॅप्स चुकूनही करू नका डाऊनलोड अन्यथा होईल लाखोंचं नुकसान; वेळीच व्हा सावध

लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर केला जातो. मात्र याच दरम्यान आता कस्टमर केयर स्कॅम आता समोर आला आहे. यामध्ये लोक गुगलवर संबंधित कंपनीचे कस्टमर केयर नंबर सर्च करतात. त्यांना फोन करतात. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांच्या अकाऊंटमधून पैसे गायब होतात. अशा घटना रोज देशात ऐकायला मिळतात. गुगल सर्चमध्ये कस्टमर केयरचा नंबर सर्च करताना नेहमी पहिला रिझल्ट हा फेक नंबर असतो. मात्र सर्वसामान्य लोकांना यासंबंधीची माहिती नसते. 

गुगलवर नंबर मिळाल्यानंतर लोकांना खऱ्या कस्टमर केयरला फोन लावला आहे असं वाटतं. पण जास्तीत जास्त लोकांना फेक कस्टमर केयरशी नव्हे तर एका फ्रॉड कॉलशी संपर्क केलेला असतो. कस्टमर केयर फ्रॉड मध्ये सर्वात मोठे शस्त्र म्हणजे रिमोट कंट्रोलचे अ‍ॅप आहे. सायबर गुन्हेगार म्हणजेच फेक कस्टमर केयरचे लोक या मेसेजमधून एक लिंक पाठवत असतात. ज्यातून त्यांना रिमोटचा अ‍ॅक्सेस मिळत असतो. कोणताही अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर त्याचा संपूर्ण अ‍ॅक्सेस फ्रॉडच्या हातात जातो. 

Web Title: send your location to anyone without internet follow this trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.