सूर्याच्या किरणांपासून पाणी शुद्ध करण्याचं नवीन तंत्रज्ञान विकसित!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 15:00 IST2018-11-29T14:58:10+5:302018-11-29T15:00:08+5:30
सध्या वातावरणातील वाढत्या प्रदुषणासोबतच पाण्याची कमतरताही भासत आहे. पावसाच्या कमतरतेमुळे नद्या कोरड्या पडत आहेत आणि त्यामुळे अनेक गांवांपर्यंत पाणी पोहोचत नाही.

सूर्याच्या किरणांपासून पाणी शुद्ध करण्याचं नवीन तंत्रज्ञान विकसित!
सध्या वातावरणातील वाढत्या प्रदुषणासोबतच पाण्याची कमतरताही भासत आहे. पावसाच्या कमतरतेमुळे नद्या कोरड्या पडत आहेत आणि त्यामुळे अनेक गांवांपर्यंत पाणी पोहोचत नाही. याव्यतिरिक्त जे काही पाणी अस्तित्वात आहे ते अत्यंत अस्वच्छ आहे. ते स्वच्छ करण्यासाठी सरकारचे कोट्यावधी रूपये खर्च होतात. सध्या महाराष्ट्रातही पाऊस कमी पडल्यामुळे अनेक गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
वैज्ञानिकांनी यावर एक उपाय शोधून काढला आहे. ज्यामध्ये सूर्यप्रकाशाचा वापर करून पाण्यामधील दुषित घटक दूर करण्यात येणार आहेत. जर्मनीमध्ये मार्टिन ल्यूथर विश्वविद्यालय हेले विटेनबर्गमधील संशोधकांनी, पाण्यामधील दूषित घटकांना हटवण्यासाठी पाण्यामध्ये सहजपणे सोडण्यासाठी गतिशील इलेक्ट्रॉन्स म्हणजेच हायड्रेटेड इलेक्ट्रॉन्सचा वापर केला.
एमएलयूमध्ये प्रोफेसर मार्टिन गोएजाने सांगितले की, 'हे इलेक्ट्रॉन फारा प्रतिक्रियाशील आहेत आणि त्यामुळे पाण्यामध्ये प्रतिक्रिया घडवून आणण्यासाठी यांचा वापर केला जाऊ शकतो. हे इलेक्ट्रॉल अत्यंत धोकादायक अशा दूषित घटकांना नष्ट करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यासाठी इलेक्ट्रॉल्सना आण्विक यौगिकांमधून सोडलं जातं. एका अणूने (Atom) दुसऱ्या अणूवर इलेक्ट्रॉन (Transfer of electron)स्थानांतर करण्यामुळे तयार होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेला (Chemical bond)आण्विक यौगिका असं म्हटलं जातं. तिथे त्यांना पूर्णपणे बंद ठेवण्यात येतं. आतापर्यंत असे इलेक्ट्रॉल तयार करणं अत्यंत अवघड आणि खर्चिक होतं.
संशोधकांनी एक नवीन प्रक्रिया विकसित केली आहे. ज्यामध्ये ऊर्जेचा एकमेव स्त्रोत म्हणून ग्रीन लाइट एमिटिंग डायोडची गरज असते. अशी प्रक्रिया करण्यासाठी उत्प्ररेक म्हणून व्हिटॅमिन सी आणि धातू मिश्रणाचा वापर करतात.
या नवीन प्रणालीची पुढे तपासणी केल्यानंतर समजले की, हायड्रेट इलेक्ट्रॉन तयार करण्याची ही एक सक्षम पद्धत आहे. त्याचबरोबर याचे अनेक उपयोग आहेत. संशोधकांनी या नवीन पद्धतीचा वापर प्रदूषित पाण्यावर केला. छोट्या प्रमाणावर करण्यात आलेल्या प्रक्रियेमुळे पाण्यातून प्रदुषित घटक हटवण्यासाठी मदत मिळाली.