सत्या नाडेलांनी ChatGPT ची 'चव चाखली'; 'बिर्याणी' उत्तर पाहून डोक्यावर हात मारला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 02:44 PM2023-01-05T14:44:22+5:302023-01-05T14:45:45+5:30

सत्या नाडेला यांनी चॅट जिपीटीचे टेस्टिंग केले. यासाठी त्यांनी सर्वात प्रसिद्ध साऊथ इंडियन डिश कोणती असा प्रश्न ChatGPT ला केला.

Satya Nadella gets a taste of ChatGPT; After seeing the 'Biryani' answer, openAI said sorry | सत्या नाडेलांनी ChatGPT ची 'चव चाखली'; 'बिर्याणी' उत्तर पाहून डोक्यावर हात मारला

सत्या नाडेलांनी ChatGPT ची 'चव चाखली'; 'बिर्याणी' उत्तर पाहून डोक्यावर हात मारला

Next

गेल्या काही आठवड्यांपासून जगभरात Open AI च्या चॅट जीपीटी (ChatGPT) च्या जोरदार चर्चा आहेत. चॅट जीपीटी सर्च इंजिन जायंट गुगललाही रिप्लेस करेल असे बोलले जात आहे. लोकांनी याची टेस्टिंग करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या, परंतू चॅट जीपीटीवर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला खूप नाराज दिसले आहेत. 

सत्या नाडेला यांनी चॅट जिपीटीचे टेस्टिंग केले. यासाठी त्यांनी सर्वात प्रसिद्ध साऊथ इंडियन डिश कोणती असा प्रश्न ChatGPT ला केला. यामध्ये लाइट ब्रेकफास्ट किंवा टी-टाइम मील्स असे विचारण्यात आले होते. यावर चॅट जीपीटीने इडली, डोसा, वड़ा, पोंगल आणि उत्तप्पा असे सांगितले. या उत्तरावर नाडेलांसोबत सारे खूश झाले. 

पण पुढे चॅट जीपीटी ने काही सांगितले, ते पाहून सारेच चक्रावले. चॅट जीपीटीने साऊथ इंडियन टिफिनच्या यादीत बिर्याणीचा उल्लेख केला. यावर नाडेला नाराज झाले. मायक्रोसॉफ्टने ChatGPT च्या कंपनीत म्हणजेच Open AI मध्ये $1 बिलियनची गुंतवणूक केली आहे. कंपनीने आपल्या उत्पादनांमध्ये ChatGPT एम्बेड करण्याची योजना आखली आहे. आपले सर्च इंजिन ताकदवर करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट चॅट जीपीटी वापरू शकते, असेही सांगितले जात आहे. 

चॅटजीपीटीच्या उत्तरावर सत्या नडेला म्हणाले की, बिर्याणीला टिफिनच्या लिस्टमध्ये टाकून तुम्ही हैदराबादी म्हणून माझा अपमान करू शकत नाही. यावर नडेला यांच्या या प्रतिक्रियेवर चॅटबॉटने माफी मागितली आहे. ही घटना बेंगळुरूमध्ये सुरू असलेल्या मायक्रोसॉफ्ट फ्यूचर रेडी लीडरशिप समिट दरम्यान घडली. यावेळी नडेला यांनी चॅट जीपीटीला सर्व दर्शकांसमोरच टेस्ट केले. नडेला चिडले नव्हते पण मस्करीच्या मुडमध्ये होते, परंतू त्यांच्या या वाक्याने सभागृहात हशा पिकला होता. 
 

Web Title: Satya Nadella gets a taste of ChatGPT; After seeing the 'Biryani' answer, openAI said sorry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.