ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 19:32 IST2025-08-07T19:30:49+5:302025-08-07T19:32:09+5:30

Samsung Galaxy A17 5G Launched: सॅमसंगने त्यांचा नवा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए१७ 5G लॉन्च केला आहे.

Samsung has launched a new 5G phone to attract customers, the price is also lower! | ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!

सॅमसंगने त्यांचा नवा स्मार्टफोनसॅमसंग गॅलेक्सी ए१७ 5G लॉन्च केला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आणि ५० मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह अनेक आकर्षित फीचर्स मिळत आहेत. हा फोन या वर्षाच्या सुरुवातीला लाँच झालेल्या Galaxy A१६ ५G चा अपग्रेडेड मॉडेल आहे, त्याला आयपी ५४ डस्ट आणि वॉटर प्रूफ रेटिंग मिळते.

हा फोन युरोपियन बाजारात लॉन्च करण्यात आला आहे, जो ४ जीबी रॅम/ १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम/२५६ जीबी अशा दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये बाजारात दाखल झाला आहे. सॅमसंगचा हा फोन सुमारे २४ हजार रुपयांत सादर करण्यात आला आहे. हा फोन सॅमसंगच्या अधिकृत स्टोअरमधून ब्लू, ब्लॅक आणि ग्रे या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये प्री-ऑर्डर करता येईल.

फोनमध्ये ६.७ इंचाचा FHD+ इन्फिनिटी U सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन १०८० x २३४० पिक्सेल आहे. फोनचा डिस्प्ले ९०Hz रिफ्रेश रेट फीचरला सपोर्ट करतो. पाणी आणि धूळ संरक्षणासाठी या फोनला आयपी ५४ रेटिंग देण्यात आले.

सॅमसंग गॅलेक्सी ए१७ 5G मध्ये Exynos १३३० प्रोसेसर आहे. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे, जो पॉवर बटणासह इंटिग्रेटेड आहे. फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि दोन मेगापिक्सेलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळत आहे. शिवाय, या फोनमध्ये ५०००mAh बॅटरीसह २५W USB टाइप C चार्जिंग फीचर आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये ५G/४G नेटवर्क, ब्लूटूथ ५.३, वाय-फाय आणि USB टाइप C सारखी फीचर्स मिळत आहे.

Web Title: Samsung has launched a new 5G phone to attract customers, the price is also lower!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.