Samsung ची बंपर ऑफर, अर्ध्याहून कमी किमतीत मिळतोय Galaxy S23 Ultra स्मार्टफोन!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 01:32 PM2023-03-13T13:32:55+5:302023-03-13T13:34:22+5:30

सॅमसंगचा फ्लॅगशिप स्मार्टफोन तुम्हाला कमीत कमी किमतीत खरेदी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

samsung galaxy s23 ultra discount offer s23 discount exchange emi option | Samsung ची बंपर ऑफर, अर्ध्याहून कमी किमतीत मिळतोय Galaxy S23 Ultra स्मार्टफोन!

Samsung ची बंपर ऑफर, अर्ध्याहून कमी किमतीत मिळतोय Galaxy S23 Ultra स्मार्टफोन!

googlenewsNext

नवी दिल्ली-

सॅमसंगचा फ्लॅगशिप स्मार्टफोन तुम्हाला कमीत कमी किमतीत खरेदी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. कंपनीनं यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च झालेल्या Galaxy S23 सीरिजवर मोठा डिस्काऊंट मिळत आहे. या सीरिजमध्ये कंपनीचे तीन स्मार्टफोन आहेत. यात Galaxy S23, S23 Plus आणि S23 Ultra यांचा समावेश आहे. याच फोन्सवर जबरदस्त ऑफर दिली जात आहे. 

स्मार्टफोन्सवर नो-कॉस्ट EMI, एक्स्चेंज बोनस आणि इतर काही फायदे मिळवता येत आहेत. ग्राहकांना १८ हजार रुपयांपर्यंतचा फायदा या बोनस ऑफरमध्ये मिळवता येणार आहे. या सर्व ऑफर्सचा लाभ घेऊन तुम्ही Galaxy S23 Ultra फोन ५९ हजारात खरेदी करू शकता. 

Samsung Galaxy S23 सीरिजवर ऑफर कोणत्या?
सॅमसंगच्या Galaxy S23 आणि S23 Plus वर १३ हजार रुपयांचा फायदा मिळवता येईल. तसंच १२ महिन्यांच्या नो-कॉस्ट EMI चा पर्याय देखील उपलब्ध आहे. तसंच हा फोन तुम्ही २४ महिन्यांच्या नो-कॉस्ट EMI वर देखील खरेदी करू शकता. ज्याचा दरमहा EMI तुम्हाला ३,१२४ रुपये इतका पडेल. याशिवाय ग्राहकांना ८ हजार रुपयांचा अपग्रेड बोनस दिला जात आहे. 

Galaxy S23 फोन कंपनीनं ७४,९९९ रुपयांमध्ये लॉन्च केला होता. यात 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळतो. तर 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत ७९,९९९ रुपये इतकी आहे. हा फोन चार रंगात उपलब्ध आहे. यात फँटम ब्लॅक, लेवेंडर, ग्रीन आणि क्रीम रंगांचा समावेश आहे. 

Galaxy S23 Plus बाबत बोलायचं झालं तर या फोन कंपनीनं ९४,९९९ रुपयांच्या किमतीवर लॉन्च केला होता. ही किंमत फोनच्या 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची आहे. तर याचं 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत १,०४,९९९ रुपये इतकी आहे. फोन फँटम ब्लॅक आणि क्रीम रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. 

Ultra वर बंपर ऑफर
Galaxy S23 Ultra जवळपास ५९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. सॅमसंगच्या या फोनवर १८ हजार रुपये आणि १२ महिन्यांचा नो-कॉस्ट EMI चा पर्याय दिला जात आहे. तसंच १० हजारांचा अॅडिशनल अपग्रेड बोनस दिला जात आहे. 

Web Title: samsung galaxy s23 ultra discount offer s23 discount exchange emi option

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.