Samsung Galaxy S23: सॅमसंगचा आजवरचा सर्वात पावरफुल फोन, तब्बल 200MP कॅमेरा; या दिवशी होणार लॉन्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 16:22 IST2023-01-07T16:20:53+5:302023-01-07T16:22:36+5:30

नव्या वर्षाच्या सुरुवातीसोबतच नव्या स्मार्टफोन्सच्या लॉन्चची माहिती देखील समोर आली आहे.

samsung galaxy s23 series will launch on 1 february with 200mp camera | Samsung Galaxy S23: सॅमसंगचा आजवरचा सर्वात पावरफुल फोन, तब्बल 200MP कॅमेरा; या दिवशी होणार लॉन्च!

Samsung Galaxy S23: सॅमसंगचा आजवरचा सर्वात पावरफुल फोन, तब्बल 200MP कॅमेरा; या दिवशी होणार लॉन्च!

नवी दिल्ली-

नव्या वर्षाच्या सुरुवातीसोबतच नव्या स्मार्टफोन्सच्या लॉन्चची माहिती देखील समोर आली आहे. यंदाच्या वर्षात आपल्याला अनेक स्मार्टफोन कंपन्यांचे फ्लॅगशिप डिवाइस पाहायला मिळतील. यातील एक फ्लॅगशीप सीरिज Samsung Galaxy S23 आहे. या सीरिजची अनेक जण आतुरतेनं वाट पाहात आहेत. तसंच या सीरिजच्या लॉन्चबाबतही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. 

आता सॅमसंगच्या या सीरिजच्या अधिकृत लॉन्चिंगची तारीख समोर आली आहे. १ फेब्रुवारी रोजी सॅमसंगच्या गॅलेक्सी एस २३ सीरिजचे फोन लॉन्च होणार आहेत. सॅमसंग कोलंबियाच्या अधिकृत वेबसाइटवर याची माहिती देण्यात आली आहे. फोन बाबत अद्याप जास्त माहिती मिळू शकलेली नसली तरी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. या सीरिजमध्येही गेल्या वर्षीप्रमाणेच तीन नवे स्मार्टफोन पाहायला मिळू शकतात. 

पुढील महिन्यात लॉन्च होणार सर्वात तगडा फोन
Galaxy Unpacked इव्हेंटची पुढील महिन्याची पहिली तारीख निश्चित झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या नव्या स्मार्टफोन सीरिजबाबतची माहिती लिक होत होती. टीझरमध्ये नव्या फोनचा जबरदस्त कॅमेरा सेटअप पाहायला मिळत आहे. 

नुकतंच सॅमसंगनं गॅलेक्सी एस २३ आणि गॅलेस्की एस २३ अल्ट्राचा लूक समोर आला होता. हे स्मार्टफोन कॉटन फ्लॉवर, Mistly Lilac, Botanic Green आणि फँटम ब्लॅक अशा रंगात उपलब्ध होणार आहेत. 

असे असू शकतात फिचर्स-
रिपोर्ट्सनुसार सॅमसंगच्या नव्या सीरिज फोनमध्ये तब्बल 200MP कॅमेरा सेटअप पाहायला मिळू शकतो. जो सीरिजच्या अल्ट्रा व्हेरिअंटमध्ये पाहायला मिळेल. याशिवाय S23 Plus आणि S23 मध्ये 50MP चा मेन लेन्स पाहायला मिळू शकतो. 

तिन्ही स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर पाहायला मिळू शकतो. कंपनीच्या काही रिजनमध्ये हँडसेटला Exynos प्रोसेसरसह लॉन्च केला जाऊ शकतो. सीरिजच्या डिझाइनमध्येही फार काही बदल पाहायला मिळणार नाहीत. अर्थात सॅमसंगनं अद्याप अधिकृतरित्या फोनचे फिचर्स आणि डिझाइनबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.  

Web Title: samsung galaxy s23 series will launch on 1 february with 200mp camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.