सॅमसंग बिक्सबी व्हर्च्युअल असिस्टंट भारतीय ग्राहकांना सादर

By शेखर पाटील | Published: August 23, 2017 02:00 PM2017-08-23T14:00:00+5:302017-08-23T14:00:00+5:30

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी एस ८ आणि एस८ प्लसच्या युजर्ससाठी जाहीर केलेला बिक्सबी हा व्हर्च्युअल असिस्टंट आता भारतासह अन्य देशांमधील युजर्सला देण्यात येत आहे.

samsung bixby virtual assistant rolled out for india | सॅमसंग बिक्सबी व्हर्च्युअल असिस्टंट भारतीय ग्राहकांना सादर

सॅमसंग बिक्सबी व्हर्च्युअल असिस्टंट भारतीय ग्राहकांना सादर

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात फक्त दक्षीण कोरियातील युजर्सलाच हा असिस्टंट सादर करण्यात आला होतायानंतर जुलै महिन्यात अमेरिकन ग्राहकांना इंग्रजी भाषेच्या सपोर्टसह हा असिस्टंट प्रदान करण्यात आला सॅमसंगने अधिकृतपणे येत्या काही दिवसांमध्ये सुमारे २०० देशांमध्ये अपडेट देण्यात येत असल्याची घोषणा केली

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी एस ८ आणि एस८ प्लसच्या युजर्ससाठी जाहीर केलेला बिक्सबी हा व्हर्च्युअल असिस्टंट आता भारतासह अन्य देशांमधील युजर्सला देण्यात येत आहे.
यावर्षी सॅमसंग कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस हे दोन मॉडेल सादर केले होते. यात बिक्सबी हा व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीवर चालणारा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट असेल असे जाहीर करण्यात आले होते. तथापि, पहिल्या टप्प्यात फक्त दक्षीण कोरियातील युजर्सलाच हा असिस्टंट सादर करण्यात आला होता. अर्थात यात कोरियन भाषेच्या ध्वनी आज्ञावलीचा सपोर्ट प्रदान करण्यात आला होता. यानंतर जुलै महिन्यात अमेरिकन ग्राहकांना इंग्रजी भाषेच्या सपोर्टसह हा असिस्टंट प्रदान करण्यात आला होता. आता लवकरच सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ हे मॉडेल लाँच होणार असून या पार्श्‍वभुमिवर, या असिस्टंटची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. भारतासह इतर देशांमधील युजर्सला याची सुविधा देण्यात आली आहे. सॅमसंगने अधिकृतपणे येत्या काही दिवसांमध्ये सुमारे २०० देशांमध्ये अपडेट देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. बिक्सबी वेकअप आणि बिक्सबी डिटेक्शन या अ‍ॅपच्या अपडेटच्या माध्यमातून ही सुविधा मिळू लागली आहे. काही युजर्सला हे अपडेट मिळाले असून इतरांना क्रमाक्रमाने मिळणार आहे. मात्र हा असिस्टंट जितक्या सफाईदार पध्दतीने कोरियन भाषेत काम करतो तितका इंग्रजीत कार्यक्षम नसल्याची काही युजर्सची ओरड आहे. यातच सध्या तरी सॅमसंग गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या उच्च श्रेणीतल्या मॉडेल्ससाठी याला सादर करण्यात आले असले तरी अन्य मॉडेल्समध्ये याची सुविधा केव्हा मिळणार याची आता युजर्सला प्रतीक्षा आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ या मॉडेलमध्ये बिक्सबी असेल असे मानले जात आहे.
बिक्सबीचे फिचर्स
बिक्सबी या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटमध्ये व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने विविध फंक्शन्स पार पाडता येतात. यात दैनंदिन शेड्युलपासून ते गुंतागुंतीची कामे फक्त स्मार्टफोनशी बोलून करता येतात. याला सॅमसंग स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केलेल्या विविध अ‍ॅप्सशी जोडता येते. यानंतर या अ‍ॅप्सचे फंक्शनची बिक्सबी वरूनच वापरता येतात. गुगलचा गुगल असिस्टंट आणि अ‍ॅपलच्या सिरीशी बिक्सबीची नेहमी तुलना करण्यात येते.

Web Title: samsung bixby virtual assistant rolled out for india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.