iPhone XS साठी बाथटबमधून चिल्लर घेऊन गेला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 19:42 IST2018-11-14T19:40:39+5:302018-11-14T19:42:39+5:30
अॅपलचा आयफोन घेण्यासाठी बऱ्याचदा किडनी विकल्याची बातमी आपण ऐकली असेल.

iPhone XS साठी बाथटबमधून चिल्लर घेऊन गेला...
अॅपलचा आयफोन घेण्यासाठी बऱ्याचदा किडनी विकल्याची बातमी आपण ऐकली असेल. पण एका रशियाच्या व्यक्तीने कहरच केला. iPhone XS खरेदी करण्यासाठी त्याने बाथ टबमध्ये भरून तब्बल 1 लाख रुसी रुबलची चिल्लर आयफेनच्या स्टोअरमध्ये नेत फोन घेतला. ही चिल्लर मोजायला दुकानदाराने क्लार्कलाच बसविले आणि हा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली.
रशियाच्या या युवकाने बाथ टबमध्ये 1 लाख रुबल म्हणजेच 1.07 लाख रुपयांची चिल्लर भरली. एवढे मोठे वजन उचलण्यासाठी त्याला त्याच्या मित्रांचीही मदत घ्यावी लागली. त्याला या लवाजम्यासह पाहून स्टोअर मालकही थक्क झाला. त्याने या युवकाला माघारी न पाठविता ती चिल्लर मोजण्यासाठी क्लार्कला बसविले. सर्व चिल्लर मोजून झाल्यानंतरच त्या युवकाला iPhone XS चे 256 जीबीचे व्हेरिअंट देण्यात आले.