दिवसाचा इंटरनेट डेटा संपला? Jio चा स्वस्तातला प्लॅन, २८ दिवस व्हिडीओ पाहता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 07:11 PM2022-11-26T19:11:29+5:302022-11-26T19:11:56+5:30

जे लोक अधिक व्हिडीओ पाहतात, त्यांच्यासाठी हा प्लॅन उपयोगाचा आहे.

Run out of internet data for the day? Jio's cheapest plan, you can watch videos for 28 days in 122 rs | दिवसाचा इंटरनेट डेटा संपला? Jio चा स्वस्तातला प्लॅन, २८ दिवस व्हिडीओ पाहता येणार

दिवसाचा इंटरनेट डेटा संपला? Jio चा स्वस्तातला प्लॅन, २८ दिवस व्हिडीओ पाहता येणार

Next

खूप डेटा वापरणाऱ्यांसाठी जिओने एक चांगला प्लॅन आणला आहे. तुमचा नेहमीचा डेटा संपला की जादाचा डेटा हवा असल्यास २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लन आणला आहे. याद्वारे युजर्सना दररोज १ जीबी डेटा मिळणार आहे. 

जे लोक अधिक व्हिडीओ पाहतात, त्यांच्यासाठी हा प्लॅन उपयोगाचा आहे. या प्लॅनची किंमत १२२ रुपये आहे. हा प्लॅन जिओफोन वापरकर्त्यांसाठी आहे. यामध्ये कॉलिंग नाही तर फक्त डेटा दिला जातो. 

JioPhone च्या 122 रुपयांच्या डेटा पॅकची वैधता 28 दिवस आहे. इंटरनेटद्वारे रील आणि व्हिडिओ पाहण्यासाठी एकूण 28 जीबी डेटा ऑफर केला जातो. जिओच्या या १२२ रुपयांच्या प्लानमध्ये व्हॉईस कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा उपलब्ध नाही. नेहमीची डेटा लिमिट संपली की डेटा स्पीड 64Kbps पर्यंत कमी होतो. त्यावर हा प्लॅन काम करतो. 

Jio कडून असे एकूण 5 डेटा प्लॅन ऑफर केले जातात. हे सर्व प्लॅन जिओफोन वापरकर्त्यांसाठी आहेत. 26 रुपये, 62 रुपये, 86 रुपये, 122 रुपये आणि 182 रुपये असे हे प्लॅन आहेत. महत्वाचे म्हणजे हा डेटा तुम्हाला २८ दिवसांत संपवावा लागणार आहे. 182 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा उपलब्ध आहे. 86 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 0.5 GB डेटा मिळतो26 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2 GB डेटा मिळतो. 
 

Web Title: Run out of internet data for the day? Jio's cheapest plan, you can watch videos for 28 days in 122 rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.