नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीज एजीएम 2019 मध्ये कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. जिओ लाँच केल्यानंतर रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात खळबळ माजविली होती. यातून प्रतिस्पर्धी कंपन्या सावरत नाहीत तोच रिलायन्सने जिओ गिगाफायबरची बंपर लॉटरी फोडली आहे. यामुळे पुन्हा बाजारात खळबळ उडणार आहे. सुरूवातीला 1600 शहरांमध्ये सेवा सुरू करण्यात येणार आहे.
जिओ गिगाफायाबरच्या प्लॅनची सुरुवात 700 रुपयांपासून सुरु होणार आहे. हे प्लॅन 10 हजार रुपयांपर्यंत आहेत. तसेच फायबर अॅन्युअल वेलकम ऑफरअंतर्गत 4D/4K टीव्ही आणि त्याचसोबत 4K ची मजा लुटण्यासाठी सेट अप बॉक्स मोफत मिळणार आहे. गिगाफायबरची सेवा येत्या 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
Jio Fiber चा डेटा प्लॅन 700 रुपयांपासून सुरू होणार आहे. याचा वेग 100 Mbps असेल. यामध्ये ग्राहकांना ब्रॉडबँड, Jio होम टीव्ही आणि Jio IoT सेवा मिळणार आहे. यासोबतच जिओ लँडलाईन सेवा मोफत देणार आहे. यामध्ये आयएसडी कॉलिंगचे दर हे इतर कंपन्यांपेक्षा दहा पटींनी कमी असणार आहेत. या टेरिफची माहिती 5 सप्टेंबरला जिओच्या वेबसाईटवर मिऴणार आहे.
रिलायन्स जिओच्या बंपर लॉटरीसोबत भरतीही; अभियंत्यांसाठी छप्परफाड संधी
महत्वाचे-
- Jio Fiber प्लॅन 700 ते 10 हजार
- आयुष्यभर मोफत कॉलिंग
- अमेरिका, कॅनडासाठी 500 रुपयांचे अनलिमिटेड प्लॅन
फर्स्ट डे फर्स्ट शो प्रीमियम Jio Fiber ग्राहक सिनेमे रिलीजच्या दिवशीच घरबसल्या पाहता येणार. जिओने या प्लॅनला फर्स्ट डे फर्स्ट शो असे नाव दिले आहे. ही सेवा 2020 पासून सुरू होणार आहे.