Jio Phone Gift Card: रिलायन्स जिओचा दिवाळी धमाका! जियोफोन गिफ्ट कार्ड लाँच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 16:22 IST2018-10-29T16:10:02+5:302018-10-29T16:22:18+5:30
रिलायन्स जिओनेही ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. जिओने एक फेस्टिव्ह गिफ्ट कार्ड आणलं आहे. हे कार्ड तुम्ही तुमच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना गिफ्ट करु शकतात.

Jio Phone Gift Card: रिलायन्स जिओचा दिवाळी धमाका! जियोफोन गिफ्ट कार्ड लाँच
नवी दिल्ली - सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांची जय्यत तयारी सुरू आहे. सणांचा मुहूर्त साधत ग्राहकांसाठी सेलचं आयोजन करण्यात येत असताना आता रिलायन्सजिओनेही ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. जिओने एक फेस्टिव्ह गिफ्ट कार्ड आणलं आहे. हे कार्ड तुम्ही तुमच्या कुटुंबियांना किंवा मित्रांना गिफ्ट करु शकतात.
रिलायन्स जिओफोन गिफ्ट कार्ड असं या कार्डचं नाव असून 1095 रुपये या कार्डची किंमत आहे. रिलायन्स डिजिटल स्टोअर्सबरोबरच अॅमेझॉनच्या वेबसाईटवरही या कार्डची खरेदी करता येणार आहे. रिलायन्स जिओकडून हे गिफ्ट कार्ड मान्सून हंगामा ऑफरअंतर्गत जारी करण्यात आलं आहे. या कार्डद्वारे युजर कोणत्याही ब्रँडच्या जुन्या फोनच्या बदल्यात नवा जिओफोन 501 रुपयात विकत घेऊ शकतो. तसेच या गिफ्ट कार्डसोबत 594 रुपयांचं स्पेशल रिचार्ज देखील मिळणार आहे. या कार्डच्या माध्यमांतून ग्राहकांना अनेक सेवांचा मोफत लाभ घेता येणार आहे.
रिलायन्स जिओफोन गिफ्ट कार्डचा फायदा
- या स्पेशल रिचार्जची वैधता ही सहा महिन्यांसाठी म्हणजेच 180 दिवसांसाठी असणार आहे.
- युजर्सना या प्लॅन अंतर्गत एफयूपी शिवाय अनलिमिटेड लोकल, रोमिंग आणि नॅशनल कॉलिंगची सेवा मिळणार आहे.
- युजर्सना 6 महिन्यांसाठी 300 एसएमएस मोफत मिळणार आहेत.
- दररोज 500 एमबी हाय-स्पीड 4जी डेटा, म्हणजेच युजर्सनाचा एकूण 90 जीबी डेटा मिळणार आहे.
- एक्सचेंज बोनस अंतर्गत युजर्सना 6 जीबी जास्त डेटा मिळेल.