Reliance Jio Celebration Pack: मोफत मिळत आहे, 10GB डेटा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 20:36 IST2018-10-29T20:35:37+5:302018-10-29T20:36:12+5:30
Reliance Jio Celebration Pack: रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर आणली आहे. कंपनीने जिओ सेलिब्रेशन पॅक आणला आहे. यामध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांना 10 जीबी डेटा मोफत मिळणार आहे.

Reliance Jio Celebration Pack: मोफत मिळत आहे, 10GB डेटा...
नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक बंपर ऑफर आणली आहे. कंपनीने जिओ सेलिब्रेशन पॅक आणला आहे. यामध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांना 10 जीबी डेटा मोफत मिळणार आहे. या ऑफरची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर आहे. चार दिवसांचा या मर्यादित प्लॅनमध्ये दररोज आपल्याला 2 जीबी डेटा मोफत मिळणार आहे.
रिलायन्स जिओने पहिल्यांदा सप्टेंबरमध्ये हा सेलिब्रेशन पॅक लाँच केला होता. त्यावेळी कंपनीने हा पॅक पुन्हा मार्केटममध्ये आणणार असल्याचे सांगितले होते. जिओचे ग्राहक असाल आणि तुम्हाला या मोफत ऑफरचा फायदा घ्यायचा असेल तर जिओ अॅप ओपन करावे लागेल. यानंतर डिस्प्लेच्या टॉप कॉर्नरवर दिसणाऱ्या मेन्यूला सिलेक्ट करावे लागेल. मेन्यूमध्ये गेल्यानंतर माय प्लॅन सेक्शनमध्ये तुम्ही हा प्लॅन अॅक्टिव्ह झाला आहे की नाही, ते पाहू शकता.
यासोबतच, रिलायन्स जिओने दिवाळी सेलिब्रेशन ऑफर सुद्धा लाँच केली आहे. यामध्ये कंपनी आपल्या प्रीपेड रिचार्ज पॅकवर 100 टक्के डिस्काउंट देत आहे. हा डिस्काउंट रिलायन्स डिजिटल कूपनच्या माध्यमातून मिळणार आहे. ही ऑफर 149 रुपयांपेक्षा जास्त प्रीपेड रिचार्ज प्लॅनसाठी आहे. याशिवाय जिओने 1699 रुपयांचा एक स्पेशल प्लॅन सुद्धा मार्केटमध्ये लाँच केला आहे. या प्लॅनची मर्यादा 365 दिवस आहे. तसेच, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलसह 1.5 जीबी डेटा मिळत आहे.