Reliance Jio Anniversary Offer: 399 च्या रिचार्जवर 300 रुपयांची सूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 13:37 IST2018-09-12T13:35:55+5:302018-09-12T13:37:56+5:30
या महिन्यात रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी ऑफर्सचा धूमाकूळ आहे. कंपनीने आपल्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स आणल्या आहेत. यामध्ये सध्या रिलायन्स जिओने एक ऑफर लाँच केली आहे.

Reliance Jio Anniversary Offer: 399 च्या रिचार्जवर 300 रुपयांची सूट
नवी दिल्ली : या महिन्यात रिलायन्सजिओच्या ग्राहकांसाठी ऑफर्सचा धूमाकूळ आहे. कंपनीने आपल्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स आणल्या आहेत. यामध्ये सध्या रिलायन्सजिओने एक ऑफर लाँच केली आहे.
रिलायन्स जिओच्या नवीन ऑफरमध्ये ग्राहकांनी 100 रुपयांत दर महिन्याला 42 जीबी डेटा मिळणार आहे. कंपनीची ही ऑफर फक्त 399 रुपयांच्या प्लॅनवर आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांनी 399 रुपयांचे रिचार्ज केले, तर 300 रुपायांची सूट मिळणार आहे. म्हणजेच, प्रत्येक महिन्याला 100 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. या ऑफरच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि 42 जीबी डेटा ग्राहकांना दिला जाणार आहे.
याचबरोबर, 299 रुपयांमध्ये तीन महिन्यांच्या मुदतीशिवाय 126 जीबी डेटा मिळणार आहे. तसेच, 100 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. म्हणजेच 50 रुपये इंस्टेंट कॅशबॅक आणि 50 रुपये PhonePe बॅलन्स म्हणून मिळणार आहे. यासाठी ग्राहकांना रिलायन्स जिओच्या ऑफिशियल माय जिओ अॅपवर PhonePe च्या माध्यमातून रिचार्ज करावे लागणार आहे. ही ऑफर 12 ते 21 सप्टेंबरपर्यंत आहे. या कालावधीत ग्राहक फक्त एकदाच ही ऑफर रीडीम करु शकतात. रिचार्ज केल्यानंतर 24 तासांच्या आत ग्राहकांच्या PhonePe अकाउंटवर 50 रुपये कॅशबॅक मिळणार आहे.
(गोड बातमी... ५ रुपयांच्या चॉकलेटवर १ जीबी डेटा फ्री फ्री फ्री!)
दरम्यान, रिलायन्स जिओला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कंपनीने आधीच ग्राहकांचे तोंड गोड केले आहे. डेअरी मिल्क कॅडबरीच्या खरेदीवर चक्क 1 जीबी डेटा मोफत देऊन ग्राहकांशी गोडवा जपण्याचे काम जिओने केले आहे.