Reliance Jio 5G Coverage: थोडी थोडकी नव्हेत जिओने ७५ शहरे व्यापली; 1 जीबीपीएसपेक्षाही मिळतोय 5G स्पीड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 15:57 IST2023-01-08T15:56:09+5:302023-01-08T15:57:41+5:30
घराच्या बाहेर गेल्यावर लोकांना ५जी सिग्नल मिळत आहेत. जिओ ५जी वापरण्यासाठी तुमच्याकडे २३९ रुपयांपेक्षा अधिकचा प्लॅन असणे गरजेचे आहे.

Reliance Jio 5G Coverage: थोडी थोडकी नव्हेत जिओने ७५ शहरे व्यापली; 1 जीबीपीएसपेक्षाही मिळतोय 5G स्पीड
जिओ आणि एअरटेलने 5G सेवा सुरु करून आता तीन महिने होत आले आहेत. एअरटेलने जरी ४जी सेवा सुरु करताना जिओला पछाडले असले तरी जिओने मागून येऊन बऱ्याच शहरांमध्ये वेगाने नेटवर्क उभे केले आहे. वेगही एवढा भन्नाट मिळतोय की १.४ जीबीपीएसपर्यंत आकडा जात आहे.
रिलायन्स जिओने जवळपास ७५ शहरांमध्ये फाईव्ह जी लाँच केले आहे. यामुळे पुढच्या काही महिन्यांत छोट्यातली छोटी शहरे देखील ५जी सेवा मिळणारी बनतील अशी शक्यता आहे. कंपनीने जयपूर, जोधपूर आणि उदयपूरमध्ये 5G लाँच केले आहे. ५जी सेवा मिळणाऱ्या शहरांची यादी जिओच्या अॅपवर उपलब्ध आहे. अद्यापही घरांमध्ये ५जी रेंज येत नसेलेले बरेचसे भाग आहेत.
घराच्या बाहेर गेल्यावर लोकांना ५जी सिग्नल मिळत आहेत. जिओ ५जी वापरण्यासाठी तुमच्याकडे २३९ रुपयांपेक्षा अधिकचा प्लॅन असणे गरजेचे आहे. जिओने प्रथम दिल्ली, मुंबई, वाराणसी आणि कोलकाता येथे 5G नेटवर्क लाँच केले होते. यानंतर नाथद्वारा आणि चेन्नईसह बंगळुरू, हैदराबाद, गुरुग्राम, नोएडा, गाझियाबाद आदी शहरांमध्ये लाँच केले होते.
Jio 5G पुणे, गुजरात, उज्जैन मंदिर, कोची, गुरुवायूर मंदिर, तिरुमला, विजयवाडा, विशाखापट्टणम, गुंटूर ठिकाणी लाँच करण्यात आले. कंपनीने 28 डिसेंबर रोजी लखनौ, त्रिवेंद्रम, म्हैसूर, नाशिक, औरंगाबाद, चंदीगड, मोहाली, पंचकुला, जिरकपूर, खरार, डेराबस्सी येथे लॉन्च केले.
या शहरांमध्ये तुम्ही Jio 5G वापरू शकता. यासाठी तुमच्याकडे 5G फोन असणे आवश्यक आहे. तसेच सॉफ्टवेअर अपडेट करावे. तसेच फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन नेटवर्क मोड 5G वर सेट करावा लागणार आहे.