प्रतीक्षा संपली! Reliance नं सांगितली JioPhone Next तारीख, पाहा केव्हा होणार मोबाईल लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 04:06 PM2021-10-23T16:06:26+5:302021-10-23T16:07:04+5:30

अनेक युझर्स बऱ्याच दिवसांपासून JioPhone Next च्या प्रतीक्षेत आहेत.

Reliance confirms JioPhone Next will be launched in time for Diwali | प्रतीक्षा संपली! Reliance नं सांगितली JioPhone Next तारीख, पाहा केव्हा होणार मोबाईल लाँच

प्रतीक्षा संपली! Reliance नं सांगितली JioPhone Next तारीख, पाहा केव्हा होणार मोबाईल लाँच

Next
ठळक मुद्देअनेक युझर्स बऱ्याच दिवसांपासून JioPhone Next च्या प्रतीक्षेत आहेत.

सध्या अनेक युझर्स JioPhone Next च्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, आता JioPhone Next बद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. ग्राहकांची आता प्रतीक्षा संपणार असून लवकरच हा फोन लाँच होणार आहे. Google सोबत भागीदारी येणारा हा फोन दिवाळी म्हणजे ४ नोव्हेंबर्यंत सादर केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती Reliance Jio कडून देण्यात आली आहे. सुरूवातीला हा फोन सप्टेंबर महिन्यात लाँच होणार होता. परंतु चिप्सच्या कमतरतेमुळे त्याचं लाँचिंग पुढे ढकलण्यात आलं होतं.

JioPhone Next ची किंमत जवळपास ५ हजार रूपये असण्याची शक्यता आहे. यामध्ये 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत ७ हजारांच्या जवळ असण्याची शक्यता आहे. परंतु रिलायन्स जिओ डेटा पॅक आणि बँक ऑफर्स सोबत याची किंमत कमी असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

JioPhone Next चे फीचर्स
सध्या रिलायन्स जिओकडून याच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. परंतु Jio Phone Next टिपस्टर अभिषेक यादवने Play Console वर स्पॉट केला आहे. या लिस्टिंगमधून या फोनच्या काही स्पेक्सची माहिती मिळाली आहे. त्यानुसार हा फोन HD+ म्हणजे 720 x 1440 पिक्सल रिझोल्यूशनसह सादर केला जाईल. तसेच यात Qualcomm Snapdragon 215 मोबाईल प्लॅटफॉर्म दिला जाईल. 

आतापर्यत आलेल्या लिक्सनुसार, जियोफोन नेक्स्ट 4G मध्ये 5.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले मिळू शकतो. वर सांगितल्याप्रमाणे हा फोनमध्ये अँड्रॉइड 11 ‘गो’ एडिशनवर चालेल. तसेच प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 215 चिपसेट यात मिळण्याची शक्यता आहे. या फोनचे 2 जीबी आणि 3 जीबी रॅम असलेले व्हेरिएंट बाजारात येऊ शकतात. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्यासह बाजारात येऊ शकतो. जियोफोन नेक्स्टमध्ये 2,500एमएएच बॅटरी मिळू शकते.

Web Title: Reliance confirms JioPhone Next will be launched in time for Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app