शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
KL Rahul च्या नेतृत्वासमोर मुंबई इंडियन्स ढेपाळले; रोहित ४, तर हार्दिक गोल्डन डकवर आऊट 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

Redmi 10 नव्हे तर Redmi 10 Prime येणार भारतात; 50MP कॅमेरा असलेला रेडमी फोन वेबसाईटवर लिस्ट 

By सिद्धेश जाधव | Published: August 20, 2021 3:45 PM

Redmi 10 Prime India: सर्टिफिकेशनवरून Redmi 10 Prime चे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत आणि हा स्मार्टफोन मलेशियातील Redmi 10 चा रिब्रँड व्हर्जन असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देब्लूटूथ एसआयजी वेबसाईटवर Redmi 10 फोन मॉडेल नंबर 210611109BI सह दिसला आहे. Redmi 10 Prime स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतो.

दोन दिवसांपूर्वी Xiaomi ने आपली नवीन बजेट स्मार्टफोन सीरिज Redmi 10 लाँच केली आहे. या सीरिजमधील Redmi 10 Prime स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतो. Redmi 10 Prime स्मार्टफोन लाँच होण्याआधीच IMEI डेटाबेस आणि Bluetooth SIG सर्टिफिकेशनवर लिस्ट करण्यात आला आहे. या सर्टिफिकेशन लिस्टिंगमुळे हा फोन लवकरच देशात सादर केला जाईल, अशी चर्चा आहे.  

ब्लूटूथ एसआयजी वेबसाईटवर Redmi 10 फोन मॉडेल नंबर 210611109BI सह दिसला आहे. या सर्टिफिकेशनवरून Redmi 10 Prime चे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत आणि हा स्मार्टफोन मलेशियातील Redmi 10 चा रिब्रँड व्हर्जन असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी टीपस्टार Kacper Skrzypek ने देखील अशीच माहिती दिली होती.  

Redmi 10 चे फिचर आणि स्पेसिफिकेशन्स  

Xiaomi Redmi 10 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. पंच होल कट-आऊटसह येणार हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 20:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी यात उजव्या पॅनलवर पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच यात ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 5, Bluetooth 5.0, GPS, IR blaster, Qj 3.5mm ऑडियो जॅक असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आले आहेत. 

लाँच पूर्वी शाओमीने सांगितल्याप्रमाणे या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा Helio G88 चिपसेट देण्यात आला आहे. हा एक गेमिंग चिपसेट आहे असे कंपनीने म्हटले होते. या रेडमी फोनमध्ये 6GB पर्यंतचा LPDDR4x RAM आणि 128GB पर्यंतची eMMC स्टोरेज देण्यात आली आहे. हा बजेट स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टम आधारित MIUI 12.5 वर चालतो.   

Xiaomi Redmi 10 मध्ये कंपनीने क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे, त्याचबरोबर 8-मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेन्स, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर कॅमेरा मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या रेडमी नव्या फोनमधील 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.   

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड