शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

Apple-Samsung राहिले मागे! Realme नं सुरु केली काही मिनिटांत चार्ज होणाऱ्या स्मार्टफोनची तयारी

By सिद्धेश जाधव | Updated: February 12, 2022 15:48 IST

Realme आपल्या पहिल्या 150W फास्ट चार्जिंग असलेल्या स्मार्टफोनवर काम करत आहे. विशेष म्हणजे अ‍ॅप्पल आणि सॅमसंग या शर्यतीत कितीतरी मागे राहिले आहेत.  

Realme दिवसेंदिवस एकपेक्षा एक भारी स्मार्टफोन्स सादर करत आहे. लवकरच कंपनी आपला अल्ट्रा फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT 2 Pro भारतात सादर करणार आहे. तर आता कंपनी आपल्या पहिल्या 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या स्मार्टफोनवर काम करत आहे. आतापर्यंत सादर झालेल्या स्मार्टफोन्समध्ये 120W हा चार्जिंगचा सर्वाधिक स्पीड आहे.  

Realme चा 150W चार्जिंग स्पीड असलेला स्मार्टफोन 

टिपस्टर Digital Chat Station नं चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. रियलमीकडे 80W आणि 150W सुपर फ्लॅश चार्जिंगच्या मशीन असतील, असं पोस्टमध्ये लिहिण्यात आलं आहे. तसेच लवकरच मीडियाटेकचा Dimensity 8000 चिपसेट येणार आहे, असं देखील टिपस्टरनं सांगितलं आहे.  

चार्जिंग स्पीडमध्ये अँड्रॉइड आघाडीवर 

जेव्हा चार्जिंग स्पीडचा प्रश्न येतो तेव्हा अँड्रॉइड स्मार्टफोन्स आघाडीवर दिसतात. अ‍ॅप्पलची आयफोन 13 सीरिज 29W स्पीडसह सादर करण्यात आली आहे. तर अँड्रॉइडमध्ये शाओमी, आयकू आणि ओप्पोनं 120W स्पीडसह काही स्मार्टफोन्स सादर केले आहेत. सॅमसंगच्या स्मार्टफोनमध्ये मात्र 45W पेक्षा जास्त चार्जिंग स्पीड मिळालेला नाही.  

हे देखील वाचा:

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान