शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

जगातील सर्वात मोठ्या फोन कॅमेऱ्यासह Realme 9 4G ची एंट्री; रेडमीला टक्कर देईल अशी किंमत

By सिद्धेश जाधव | Published: April 07, 2022 2:56 PM

Realme 9 4G स्मार्टफोन भारतात 108MP कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 680 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरीसह लाँच झाला आहे.  

Realme 9 सीरिजमध्ये एका नव्या 4G फोनची भर रियलमीनं टाकली आहे. 108MP कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 680 प्रोसेसर आणि 5000mAh बॅटरीसह Realme 9 4G भारतात आला आहे. हा एक कॅमेरा सेंट्रिक स्मार्टफोन आहे. ज्यांना कमी किंमतीत 108MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन हवा असेल त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.  

Realme 9 4G चे स्पेसिफिकेशन्स  

Realme 9 4G स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. पंच होल डिजाईनसह येणारी ही स्क्रीन 1000नीट्स ब्राईटनेसला सपोर्ट करते. तसेच कॉर्निग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह येत इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. 

Realme 9 4G मधील कॅमेरा सेगमेंट खूप महत्वाचा आहे. कंपनीनं 108MP चा Samsung ISOCELL HM6 सेन्सर मुख्य कॅमेरा म्हणून दिला आहे. त्याचबरोबर सुपर वाईड लेन्स आणि मॅक्रो कॅमेरा मिळतो. तर फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.  

रियलमी 9 4जी स्मार्टफोन क्वालकॉमच्या Snapdragon 680 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU मिळतो. फोन मधील 8GB पर्यंतचा रॅम 13GB पर्यंत व्हॅच्युअली वाढवता येतो. सोबत 128GB इंटरनल मेमरी मिळते. मोबाईल Android 12 आधारित Realme UI 3.0 वर चालतो. Realme 9 4G स्मार्टफोनमधील 5000mAh ची मोठी बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Realme 9 4G ची किंमत  

Realme 9 4G स्मार्टफोनची किंमत 17,999 रुपयांपासून सुरु होईल, जी 6GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत आहे. तर 8GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 16,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन 12 एप्रिलपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. फोनचे सनबर्स्ट गोल्ड, स्टारगेज व्हाईट आणि मेटीऑर ब्लॅक असे तीन कलर व्हेरिएंट विकत घेता येतील.  

टॅग्स :realmeरियलमीMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड