रियलमीने चाहत्यांना दिला जोरदार झटका; भारतातील दोन स्मार्टफोन केले बंद  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 06:33 PM2021-11-09T18:33:09+5:302021-11-09T18:33:44+5:30

Realme 8 and Realme 8 Pro Discontinued: लाँच झाल्यानंतर फक्त 8 महिन्यांनी कंपनीने Realme 8 आणि Realme 8 Pro स्मार्टफोन आता भारतात बंद केले आहेत.

Realme 8 and realme 8 pro discontinued will no longer be on sale offline store  | रियलमीने चाहत्यांना दिला जोरदार झटका; भारतातील दोन स्मार्टफोन केले बंद  

रियलमीने चाहत्यांना दिला जोरदार झटका; भारतातील दोन स्मार्टफोन केले बंद  

Next

रियलमीने आपल्या फॅन्सना जोरदार झटका दिला आहे. कंपनीने आपले दोन फोन बंद केले आहेत. Realme ने यावर्षी मार्चमध्ये आपल्या Realme 8 सीरीजमध्ये दोन फोन सादर केले होते. या सीरीजमध्ये कंपनी सीरिजमधील Realme 8 आणि Realme 8 Pro स्मार्टफोन कंपनीने आता भारतात बंद केले आहेत, अशी माहिती 91mobiles ने दिली आहे.  

लाँच झाल्यानंतर फक्त 8 महिन्यांनी कंपनीने या दोन्ही फोनची विक्री ऑफलाइन स्टोरवर बंद करण्यात आली आहे. अशी माहिती 91मोबाईल्सला ऑफलाइन रिटेल स्टोरकडून मिळाली आहे. रिपोर्टनुसार दिल्लीतील Realme Store वर Realme 8 4G आणि Realme 8 Pro 4G स्टॉक संपेपर्यंत विकले जात आहेत.  

Realme 8 आणि Realme 8 Pro चा नवीन स्टॉक निर्माण किंवा आयात केला जाणार नाही. यामागे महत्वाचे कारण कंपनीची आगामी Realme 9 सिरीज असू शकते. जूनमध्ये Realme 9 ची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे तेव्हा Realme 9, Realme XT 3, आणि Realme GT 2 हे स्मार्टफोन कंपनीच्या भारतीय वेबसाईटवर लिस्ट झाले होते. त्यामुळे या फोन्सच्या लाँचच्या चर्चेला उधाण आले होते.  

Web Title: Realme 8 and realme 8 pro discontinued will no longer be on sale offline store 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.