Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 19:37 IST2026-01-08T19:34:15+5:302026-01-08T19:37:27+5:30

Realme 16 Pro+, Realme 16 Pro launched : भारतीय तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या 'रियलमी' (Realme) ब्रँडने आज आपली बहुप्रतिक्षित 'रियलमी 16 प्रो सिरीज' लाँच केली आहे.

Realme 16 Pro+, Realme 16 Pro launched in India with 200MP cameras, 7,000mAh battery, and a 144Hz display | Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच

Realme चा धमाका! २००MP कॅमेरा, AI ची कमाल, दमदार फीचर्ससह पॉवरफुल स्मार्टफोन लाँच

भारतीय तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या 'रियलमी' (Realme) ब्रँडने आज आपली बहुप्रतिक्षित 'रियलमी 16 प्रो सिरीज' लाँच केली आहे. या सिरीजमध्ये कंपनीने Realme 16 Pro आणि Realme 16 Pro+ हे दोन प्रीमियम स्मार्टफोन सादर केले आहेत. आकर्षक डिझाइन, जबरदस्त कॅमेरा आणि चक्क ७०००mAh ची बॅटरी हे या फोन्सचे खास फिचर्स आहेत.

Realme 16 Pro+ चे खास फीचर्स

डिस्प्ले - ६.८ इंचाचा 'अमोलेड कर्व्हड' डिस्प्ले देण्यात आला आहे, जो ६,५०० निट्सच्या जबरदस्त ब्राइटनेससह येतो. यामुळे भर उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसेल.

कॅमेरा - फोटोग्राफीसाठी यात २००MP लुमाकलर पोर्ट्रेट कॅमेरा आहे. सोबतच ५०MP चा टेलिफोटो लेन्स दिला आहे, जो १२०x पर्यंत डिजिटल झूम करू शकतो. सेल्फीसाठी ५०MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी आणि चार्जिंग - फोनमध्ये ७,०००mAh ची मोठी बॅटरी असून ती चार्ज करण्यासाठी ८०W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.

प्रोसेसर - चांगल्या परफॉर्मन्ससाठी यात क्वालकॉमचा 'स्नॅपड्रॅगन ७ जेन ४' प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

Realme 16 Pro चे खास फीचर्स

डिस्प्ले - या फोनमध्ये ६.७८ इंचाचा १४४Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आहे.

प्रोसेसर, कॅमेरा, बॅटरी - यात मीडियाटेक डायमेन्सिटी ७३०० मॅक्स प्रोसेसर असून, प्रो प्लस मॉडेलप्रमाणेच ७,०००mAh बॅटरी आणि २००MP कॅमेरा देण्यात आला आहे.

फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी पर्वणी!

फोटोग्राफीला अधिक स्टायलिश आणि क्रिएटिव्ह बनवण्यासाठी दोन्ही मॉडेल्समध्ये अॅडव्हान्स्ड सॉफ्टवेअर फीचर्सचे संपूर्ण सेट उपलब्ध करून देण्यात आला आहे. इंडस्ट्री-फर्स्ट असलेल्या व्हाईब मास्टर मोडमध्ये २१ एक्सक्लुझिव्ह कस्टमाइझ्ड टोन्स दिले आहेत, ज्यामध्ये ५ सिग्नेचर पोर्ट्रेट स्टाइल्सचा (लाईव्हली/विंटेज/फ्रेश/नियॉन/विविद) समावेश आहे, तसेच यासोबत एआय एडिट जेनिमध्ये महत्त्वपूर्ण अपग्रेड्स देण्यात आले आहेत.

एआय एडिट जेनि व्हॉइस आणि टेक्स्ट कमांड्सना सपोर्ट करते, ज्यामुळे सीमलेस एडिटिंग शक्य होतं. यामुळे वन-क्लिक स्टाइल किंवा बॅकग्राऊंड बदलताना नॅचरल फेशियल कन्सिस्टन्सी कायम ठेवली जाते तसेच व्हायरल सोशल मीडिया ट्रेंड्सचे सोपे रेप्लिकेशनही करता येतं. एआय लाइटमी आणि एआय स्टाईलमी हे कॅमेरा इंटरफेसमध्ये स्टुडिओ-ग्रेड लाईटिंग इफेक्ट्स आणि मजेदार, स्टायलाइज्ड फिल्टर्स थेट देतात.

किंमत

Realme 16 Pro+: या फोनची सुरुवातीची किंमत ३९,९९९ रुपये (८GB + १२८GB) आहे. तर १२GB + २५६GB व्हेरिएंटची किंमत ४४,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.

Realme 16 Pro: या फोनची सुरुवात ३१,९९९ रुपयांपासून होते.

विक्री: हे दोन्ही फोन्स ९ जानेवारीपासून रिअलमीची अधिकृत वेबसाईट, फ्लिपकार्ट आणि रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध होतील. बँक ऑफर्स अंतर्गत ग्राहकांना ३,००० रुपयांपर्यंतची सूटही मिळू शकते.

Web Title : Realme ने AI और शक्तिशाली फीचर्स के साथ 200MP कैमरा फोन लॉन्च किया

Web Summary : Realme ने 200MP कैमरा, 7000mAh बैटरी और स्नैपड्रैगन प्रोसेसर जैसे प्रभावशाली फीचर्स के साथ 16 प्रो सीरीज लॉन्च की। प्रो+ मॉडल में कर्व्ड AMOLED डिस्प्ले है, जबकि दोनों उन्नत फोटोग्राफी सॉफ्टवेयर प्रदान करते हैं और 9 जनवरी से उपलब्ध हैं।

Web Title : Realme Launches 200MP Camera Phone with AI, Powerful Features

Web Summary : Realme launched the 16 Pro series with impressive features, including a 200MP camera, 7000mAh battery, and Snapdragon processor. The Pro+ model boasts a curved AMOLED display, while both offer advanced photography software and are available starting January 9th.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.