Budget TWS Earbuds: फक्त 799 रुपयांमध्ये Ptron चे शानदार TWS इयरबड्स लाँच; जाणून घ्या फीचर्स 

By सिद्धेश जाधव | Published: November 18, 2021 01:03 PM2021-11-18T13:03:03+5:302021-11-18T13:03:18+5:30

Budget TWS Earbuds Ptron Bassbuds Duo Price: Ptron Bassbuds Duo हे नुकतेच लाँच झालेले TWS Earbuds आहेत जे अ‍ॅमेझॉन इंडियावरून फक्त 799 रुपयांमध्ये विकत घेता येतील.

Ptron bassbuds duo tws earbuds launched know price and feature  | Budget TWS Earbuds: फक्त 799 रुपयांमध्ये Ptron चे शानदार TWS इयरबड्स लाँच; जाणून घ्या फीचर्स 

Budget TWS Earbuds: फक्त 799 रुपयांमध्ये Ptron चे शानदार TWS इयरबड्स लाँच; जाणून घ्या फीचर्स 

Next

Budget TWS Earbuds Ptron Bassbuds Duo: Ptron ने भारतात आपले नवीन TWS इयरबड्स Ptron Bassbuds Duo लाँच केले आहेत. हे इयरबड्स कंपनीच्या वेबसाईटवर 2200 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आले आहेत. परंतु अ‍ॅमेझॉन इंडियावरून हे बड्स फक्त 799 रुपयांमध्ये विकत घेता येतील. Ptron Bassbuds Duo मध्ये टच-कंट्रोल, 15 तासांचा प्लेबॅक टाईम आणि ब्लूटूथ कनेक्टिविटी देण्यात आली आहे.  

Ptron Bassbuds Duo चे स्पेसिफिकेशन्स 

Ptron Bassbuds Duo इन-इयर डिजाईन आणि कमी वजनासह सादर करण्यात आले आहेत. यात 13mm चे डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत, जे दमदार साऊंड क्वॉलिटी देतात. यातील ब्लूटूथ 5.1 कनेक्टिव्हिटीमुळे 10 मीटर पर्यांतची रेंज मिळते. यात बड्समध्ये पॅसिव्ह नॉइज कॅन्सलेशन फंक्शन मिळते. तसेच मोनो आणि स्टीरियो कॉलिंगसाठी यात कंपनीने ड्यूल इन-बिल्ट एचडी मायक्रोफोन दिले आहेत.  

Ptron Bassbuds Duo मधील टच कंट्रोल्स कॉल रिजेक्ट किंवा अ‍ॅक्सेप्ट करू शकतात. या टच-कंट्रोलच्या मदतीने म्यूजिक आणि वॉल्यूम देखील कंट्रोल करता येते. हे बड्स IPX4 वॉटर रेजिस्टन्ससह सादर करण्यात आले आहेत. तसेच यात नवीन बड्समध्ये 35-35mAh ची बॅटरी आणि चार्जिंग केसमध्ये 300mAh ची बॅटरी आहे. दोन्ही मिळून हे 15 तासांचा प्लेबॅक टाईम देतात, असा दावा कंपनीने केला आहे. चार्जिंगसाठी बड्सच्या केसमध्ये यूएसबी टाइप-C पोर्ट देण्यात आला आहे.  

Web Title: Ptron bassbuds duo tws earbuds launched know price and feature 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.