Portable AC in Heat Wave: गरमी आली! कुलरपेक्षा भारी, तेवढ्याच किंमतीत आहेत हे २ पोर्टेबल एसी; कुठेही घेऊन जा... लाईट बिलात पैसेही वाचतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 13:05 IST2023-03-03T13:04:42+5:302023-03-03T13:05:34+5:30
आता तुम्ही विचार करत असाल की इतक्या जास्त किंमतीत कूलर कुठे येतो? येतो ना... पण एसीएवढी थंडी देत नाही...

Portable AC in Heat Wave: गरमी आली! कुलरपेक्षा भारी, तेवढ्याच किंमतीत आहेत हे २ पोर्टेबल एसी; कुठेही घेऊन जा... लाईट बिलात पैसेही वाचतील
ऑक्टोबर हिट जाणवली नाही पण फेब्रुवारीने पुढील चार-पाच महिने काय होणार आहे, याची कल्पना दिली आहे. आता दोन दिवसांवर होळी आली आहे. असे असताना सूर्य आग ओकू लागला आहे. उन्हात जा की घरात रहा अंगाची लाहीलाही होणार आहे. आता सगळेच घर काही आपण एसी करू शकत नाही. पण कुलरही काही फायद्याचे राहिले नाहीत. मग काय करणार...
सध्या बाजारात कुलरपेक्षा भारी पण त्यासारखेच दोन पोर्टेबल एसीचे पर्याय आहेत. महत्वाचे म्हणजे हे एसी घरात एका ठिकाणी फिक्स करण्याची गरज नाही. यामुळे याचा कोणत्याही खोली नेऊन वापर करणे शक्य होणार आहे. समजा तुम्ही दिवसभर हॉलमध्ये असला तर तिथे हा वापरता येईल. झोपायला गेला की बेडरुममध्ये नेता येईल. कुलरपेक्षाही कमी साईज आणि जास्त थंडावा देणारा पर्याय आहे.
पहिला पर्याय आहे ब्लूस्टार 1 टन पोर्टेबल एसी. या एसीची किंमत 39,000 रुपये आहे. यावर डिस्काऊंटही आहेत. तुम्ही गुगलवर तपासू शकता. हा एसी डिस्काऊंटवर 32,990 रुपयांना उपलब्ध आहे.
दुसरा पर्याय आहे लॉयड 1 टन 3 स्टार पोर्टेबल एसी. या एसीची किंमत 40 हजार रुपये आहे. तो डिस्काऊंटवर 34,599 रुपयांना उपलब्ध आहे.
आता तुम्ही विचार करत असाल की इतक्या जास्त किंमतीत कूलर कुठे येतो? सिम्फनीचा एक कुलर असा आहे की त्याची किंमत या एसीएवढीच आहे. Symphony Movicool Xl 100 G ची किंमत 34,800 रुपये आहे. मग त्यापेक्षा एसी घेतलेला काय वाईट नाही का... शिवाय एनर्जी सेव्हिंग रेटिंगही चांगले आहे.