शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

बजेट फ्रेंडली Poco M4 Pro 5G Phone लवकरच होणार लाँच; वेबसाईटवरून झाला स्पेसिफिकेशनचा खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 7:09 PM

Poco M4 Pro 5G Phone लवकरच भारतात लाँच केला जाऊ शकतो. हा फोन सर्टिफिकेशन साईट FCC वर लिस्ट करण्यात आला आहे.  

पोको आपला नवीन 5G Smartphone लवकरच सादर करणार आहे. हा फोन Poco M4 Pro 5G नावाने बाजारात येणार आहे. जेव्हापासून या फोनच्या लाँचची बातमी आली आहे तेव्हापासून पोकोचे चाहते या फोनची उत्सुकतेने वाट बघत आहेत. आता Poco M4 Pro 5G स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनची माहिती प्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्माने लीक केली आहे.  

याआधी हा फोन ऑक्टोबरच्या अखेरीस किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले होते. आता मुकुलने POCO M4 Pro 5G स्मार्टफोनला FCC सर्टिफिकेशन मिळाल्याचे सांगितले आहे. या लिस्टिंगनुसार हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला जाईल.  

POCO M4 Pro 5G एफसीसी लिस्टिंग  

FCC सर्टिफिकेशननुसार, या फोनचा बेस व्हेरिएंट 4GB RAM आणि 64GB स्टोरेजला सपोर्ट करेल. तर मोठा व्हेरिएंट 6GB RAM आणि 128GB स्टोरेजसह बाजारात येईल. हा फोन भारतासह जगभरात सादर केला जाऊ शकतो.  

याआधी आलेल्या लीकनुसार या फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली बॅटरी मिळू शकते. लीक्स आणि रिपोर्ट्सनुसार POCO M4 Pro स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी चिपसेटसह सादर केला जाईल. हा फोन अँड्रॉइड 11 किंवा अँड्रॉइड 12 सह मीयुआय 12.5 वर चालेल. POCO M4 Pro 5G फोन बाजारात 4GB रॅम आणि 6GB रॅम व्हेरिएंट आणि 128GB स्टोरेजसह सादर केला जाईल. त्याचबरोबर मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट मिळेल.  

फोटोग्राफीसाठी POCO M4 Pro 5G मध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा मिळू शकतो. इतर कोणत्याही सेन्सरची माहिती समजली नाही. पॉवर बॅकअपसाठी पोको एम4 प्रो मध्ये 5,000एमएएच बॅटरी मिळू शकते. पोको एम सीरिजमध्ये मिडबजेट स्मार्टफोन सादर करते, त्यामुळे हा 5जी फोन याच प्राईस सेगमेंटमध्ये सादर केला जाऊ शकतो.   

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान