शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीही फोन १००% चार्ज करताय? आताच थांबा; बॅटरी लाईफ वाढवण्याचं 'हे' आहे सीक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 18:40 IST

फोन चार्जिंगवरून कधी काढावा आणि किती टक्क्यांपर्यंत चार्ज करणे योग्य आहे, हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

आजच्या काळात फोन केवळ एक गॅझेट राहिलेला नसून ती आपल्या दैनंदिन जीवनातील एक मूलभूत गरज बनली आहे. कॉल्स, इंटरनेट, यूपीआय पेमेंट्स, काम आणि मनोरंजन अशा सर्व गोष्टी बॅटरीवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत तुमच्या फोनच्या बॅटरीची लाईफ थेट तुमच्या वापराशी संबंधित असते. तरीही, अनेक लोक चार्जिंगकडे दुर्लक्ष करतात आणि त्याच जुन्या चुका वारंवार करतात, ज्यामुळे हळूहळू बॅटरी कमकुवत होत जाते.

वस्तुस्थिती अशी आहे की, लिथियम बॅटरीची एक ठराविक 'चार्जिंग रेंज' असते. जर तुम्हाला तुमचा फोन जास्त गरम होऊ नये, बॅटरी लवकर कमी नये आणि फोन दीर्घकाळ स्मूथ चालावा असे वाटत असेल, तर फोन चार्जिंगवरून कधी काढावा आणि किती टक्क्यांपर्यंत चार्ज करणे योग्य आहे, हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

फोन १००% चार्ज करणं योग्य आहे का?

आजकालच्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये 'लिथियम आयन' बॅटरी असते. या बॅटऱ्या अत्यंत प्रगत असतात आणि ओव्हरचार्जिंगपासून स्वतःचा बचाव करू शकतात. म्हणूनच अनेकांना वाटतं की १००% चार्जिंग केल्याने काही फरक पडत नाही. पण वास्तव हे आहे की, याचा परिणाम हळूहळू जाणवतो. जेव्हा फोन ८०% च्या पुढे १००% कडे जातो, तेव्हा बॅटरीवर जास्त ताण पडतो आणि त्यातील केमिकल प्रोसेस वेगवान होते.

जर हे रोज घडत राहिले, तर काही महिने किंवा वर्षांत बॅटरीची क्षमता कमी होऊ लागते. कधीतरी १००% चार्ज केल्याने नुकसान होणार नाही, पण ती सवय लावणं चुकीचं आहे. सध्या आयफोन (iPhone) आणि अँड्रॉइडमध्ये 'ऑप्टिमाइझ्ड' (Optimised) किंवा 'अ‍ॅडॉप्टिव्ह चार्जिंग' (Adaptive Charging) सारखी फीचर्स असतात, जी चार्जिंगचा वेग नियंत्रित करून बॅटरी सुरक्षित ठेवतात. मात्र, रोज रात्रभर फोन १००% चार्जिंगला लावून ठेवल्यास बॅटरी लवकर खराब होऊ शकते.

फोन किती टक्क्यांपर्यंत चार्ज करावा?

बॅटरी तज्ज्ञ आणि टेक कंपन्यांच्या टेस्टिंगनुसार, फोनची बॅटरी २०% ते ८०% च्या दरम्यान ठेवणे सर्वात योग्य मानलं जातं. या रेंजमध्ये बॅटरी पूर्णपणे रिकामीही नसते आणि पूर्ण भरलेलीही नसते. यामुळे बॅटरीवरचा ताण कमी होतो आणि 'चार्ज सायकल' जास्त काळ चांगली राहते. सोप्या भाषेत सांगायचं तर, ८०% चार्जिंग झाल्यावर फोन काढणं हे बॅटरीसाठी फायदेशीर आहे, तर १००% पर्यंत नेणं म्हणजे तिच्याकडून 'ओव्हरटाइम' करून घेण्यासारखं आहे. जर तुम्हाला तुमचा फोन ४ ते ५ वर्षे चांगल्या स्थितीत वापरायचा असेल, तर तो ८० ते ८५ टक्क्यांच्या आसपास चार्जिंगवरून काढण्याची सवय लावा. बॅटरी ५ ते १० टक्क्यांच्या खाली वारंवार जाऊ देऊ नका, कारण पूर्णपणे डिस्चार्ज होणंही बॅटरीसाठी चांगलं नसतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Stop Charging Your Phone to 100%; Extend Battery Life!

Web Summary : Charging to 80% maximizes phone battery life. Avoid full charges and frequent complete discharges. Optimized charging features help, but don't leave it overnight.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइल