शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

फ्लिपकार्टवरून मिळणार पॅनासोनिक एल्युगा आय ९

By शेखर पाटील | Published: December 14, 2017 4:17 PM

पॅनासोनिक कंपनीने एल्युगा आय ९ हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर केले असून हा स्मार्टफोन ग्राहकांना उद्यापासून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.

पॅनासोनिक कंपनीने एल्युगा आय ९ हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर केले असून, हा स्मार्टफोन ग्राहकांना उद्यापासून फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. पॅनासोनिक एल्युगा आय ९ हा स्मार्टफोन ग्राहकांना स्पेस ग्रे, शँपेन गोल्ड आणि ब्ल्यू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ७,४९९ रुपये मूल्यात उपलब्ध करण्यात आला आहे. यातील विशेष फिचर म्हणजे यात पॅनासोनिक कंपनीने विकसित केलेला अर्बो हा व्हर्च्युअल डिजिटल असिस्टंट देण्यात आला आहे. याच्या मदतीने व्हाईस कमांडचा उपयोग करून विविध फिचर्सचा वापर करता येईल.पॅनासोनिक एल्युगा आय ९ या मॉडेलमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि एचडी (७२० बाय १२८० पिक्सल्स) क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले आहे. यात क्वॉड-कोअर मीडियाटेक एमटी६७३७ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ३ जीबी आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. पॅनासोनिक एल्युगा आय ९ या स्मार्टफोनमधील मुख्य कॅमेरा १३ तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. यातील दोन्ही कॅमेर्‍यांमध्ये एलईडी फ्लॅशची सुविधा देण्यात आली आहे. तर यातील कॅमेर्‍यात वॉटरमार्क, पॅनोरामा, बर्स्ट मोड आदींसह विविध फिल्टर्स प्रदान करण्यात आले आहेत.पॅनासोनिक एल्युगा आय ९ स्मार्टफोनमधील बॅटरी २,५०० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणार, असून यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस/ए-जीपीएस, मायक्रो-युएसबी, युएसबी-ओटीजी, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्स असतील.