एकदा फूल चार्ज केल्यानंतर ४० दिवस चार्जरकडं बघायचं नाही? Oppo A6 Pro 5G भारतात लॉन्च!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 18:53 IST2026-01-05T18:51:28+5:302026-01-05T18:53:24+5:30
Oppo A6 Pro 5G Launched in India: स्मार्टफोन उत्पादक कंपनी ओप्पोने भारतात ओप्पो ए६ प्रो 5G हा नवीन फोन लॉन्च केला

एकदा फूल चार्ज केल्यानंतर ४० दिवस चार्जरकडं बघायचं नाही? Oppo A6 Pro 5G भारतात लॉन्च!
स्मार्टफोन उत्पादक कंपनी ओप्पोने भारतात ओप्पो ए६ प्रो 5G हा नवीन फोन लॉन्च केला आहे. भारतात हा फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असून त्याची सुरुवाती किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर ४० दिवस बॅटरी टिकेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर हा फोन ६४ मिनिटांत १०० टक्के चार्ज होतो.
कंपनी या फोनवर २,००० रुपयांचे इन्स्टंट डिस्काउंट देत आहे. ही अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या क्रेडिट कार्डवर उपलब्ध आहे. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाईटसह अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर ऑरोरा गोल्ड आणि कॅप्युचिनो ब्राऊन या दोन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे. दरम्यान, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेला फोनची किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे.
या फोनमध्ये ६.७५-इंच HD+ LCD डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये ग्राहकांना मागील बाजूस ड्युअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलची मोनोक्रोम लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन IP66, IP68 आणि IP69 रेटिंगसह येतो.