तिकीट कॅन्सल करणं पडलं महागात; बँक अकाऊंटमधून गेले 4 लाख, कधीही करू नका 'ही' चूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 12:39 PM2023-08-14T12:39:25+5:302023-08-14T12:47:09+5:30

वृद्धाने आयआरसीटीसीची वेबसाइट शोधली, पण ते एका खोट्या वेबसाइटवर पोहोचले.

online fraud old man trying to cancel train tickets on irctc website | तिकीट कॅन्सल करणं पडलं महागात; बँक अकाऊंटमधून गेले 4 लाख, कधीही करू नका 'ही' चूक

तिकीट कॅन्सल करणं पडलं महागात; बँक अकाऊंटमधून गेले 4 लाख, कधीही करू नका 'ही' चूक

googlenewsNext

एका 78 वर्षीय व्यक्तीला रेल्वे तिकीट कॅन्सल करणं चांगलंच महागात पडलं असून मोठा फटका बसला आहे. रेल्वे स्टेशनवरच्या लांबच लांब रांगा टाळण्यासाठी या वृद्धला ऑनलाईन तिकीट रद्द करणं योग्य वाटलं, परंतु याचदरम्यान ते एका स्कॅममध्ये अडकले आणि त्यांच्या बँक खात्यातून तब्बल चार लाख रुपये गायब झाले. वृद्धाने आयआरसीटीसीची वेबसाइट शोधली, पण ते एका खोट्या वेबसाइटवर पोहोचले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, वृद्धाने आपलं रेल्वे तिकीट रद्द करण्यासाठी इंटरनेटवरील एका वेबसाइटची मदत घेतली. यानंतर स्वत:ला रेल्वे कर्मचारी म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीने पीडित वृद्धाला कॉल केला आणि हिंदी आणि इंग्रजी बोलता येतं असं सांगितले. त्यानंतर त्याने वृद्धाला तिकीट रद्द करण्याच्या सूचना देण्यास सुरुवात केली.

स्कॅमर्सनी सांगितले की तो वृद्धाला मदत करत आहे. यानंतर वृद्धाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्क्रीनवर निळ्या रंगाचा लोगो दिसला आणि त्यानंतर डिव्हाईसचा कंट्रोल स्कॅमर्सच्या हातात गेला. 

वृद्धाने आपले बँक तपशील आणि एटीएम कार्ड नंबर इत्यादी स्कॅमर्सशी शेअर केला. यानंतर स्कॅमर्सनी युजर्सच्या फोनमध्ये व्हायरस इन्स्टॉल केला, त्यानंतर मोबाईल रिमोट एक्सेसवर घेतला. त्यानंतर युजर्सच्या मोबाईलवरून डेटा एक्सेस, बँक डिटेल्स एक्सेस आणि ओटीपी मिळवला. 

वृद्धाला बँक खात्यातून एक संदेश आला, ज्यामध्ये 4,05,919 रुपये गेल्याची माहिती होती. यानंतर फसवणूक झाल्याचं समजलं. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. स्कॅमर्सनी बिहार किंवा पश्चिम बंगालमधून फोन केल्याचं समोर आलं. सायबर सेल पोलिसांनी सांगितलं की, स्कॅमर्सनी रेस्ट डेस्क नावाच्या एपद्वारे वृद्धाच्या मोबाईलचा एक्सेस घेतला. त्यामुळे कधीही कोणाला आपली खासगी माहिती देऊ नका. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: online fraud old man trying to cancel train tickets on irctc website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.