OnePlus Nord चे फिचर्स लीक; स्वस्त फोनमध्ये 6 कॅमेऱ्यांचा सेटअप आणि बरेच काही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 05:52 PM2020-07-13T17:52:57+5:302020-07-13T17:56:19+5:30

स्मार्टफोनची किंमत 25 हजारांच्या आत असणार आहेत. तसे पाहता वनप्लसचे फोन 35000 ते 50000 च्या आसपास आहेत. यामुळे कमी किंमतीत मध्यमवर्गातील ग्राहकाला खेचण्यासाठी वनप्लसने भारतात हा स्वस्त फोन लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.

OnePlus Nord features leaked; setup of 6 cameras in a cheap phone and much more | OnePlus Nord चे फिचर्स लीक; स्वस्त फोनमध्ये 6 कॅमेऱ्यांचा सेटअप आणि बरेच काही

OnePlus Nord चे फिचर्स लीक; स्वस्त फोनमध्ये 6 कॅमेऱ्यांचा सेटअप आणि बरेच काही

Next

नवी दिल्ली : चीनची स्मार्टफोन कंपनी वनप्लस भारतात 21 जुलैला परवडणाऱ्या दरात स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा फोन बाजारात येण्यास केवळ एक आठवडाच राहिला आहे. मात्र, त्या आधीच या OnePlus Nord फोनचे अनेक फिचर्स लीक झाले आहेत. 


या स्मार्टफोनची किंमत 25 हजारांच्या आत असणार आहेत. तसे पाहता वनप्लसचे फोन 35000 ते 50000 च्या आसपास आहेत. यामुळे कमी किंमतीत मध्यमवर्गातील ग्राहकाला खेचण्यासाठी वनप्लसने भारतात हा स्वस्त फोन लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. या फोनबद्दल  Android Central ने माहिती लीक केली आहे. या फोनमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय़ रिअर कॅमेरा संबंधी माहितीही ऑनलाईन उघड केली जात आहे. 


टेक्नॉलॉजीमधील प्रसिद्ध व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इव्हान ब्लास यांनी OnePlus Nord चे स्पेसिफिकेशन शेअर केले आहेत. तसेच या फोनचे काही टिझरही त्यांनी लीक केले आहेत. व्हर्च्युअल नॉर्डच्या प्रेझेंटेशनमध्ये हे लीक समोर आले आहेत. या स्मार्टफोनला में 6.44 इंचाचा फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट राहणार आहे. फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड सेंन्सरचा ड्युअल सेल्फी कॅमेरा सेटअप असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 
पाठीमागे चार कॅमेरा दिसत आहेत. यामध्ये 48 मेगापिक्सलचा सोनी IMX586 सेन्सरचा मुख्य कॅमेरा असेल. जो ऑप्टिकल व इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशनने युक्त असणार आहे. दुसरा 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड अँगल लेन्सचा फोन मिळणार आहे. जो 119 डिग्री कॅप्चर करणार आहे. 



तिसरी लेन्स 5 मेगापिक्सलची डेप्थ सेन्सर असून 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स असू शकते. 8/128 जीबी आणि 12/256 जीबी असे दोन व्हेरिअंट बाजारात येऊ शकतात. तसेच LPDDR4X ची रॅम असू शकते.  4,115mAh ची बॅटरी, Warp Charge 30T, Wi-Fi 2X2 MIMO, Bluetooth v5.1 आणि NFC असू शकते.  मार्बल, ग्रे ऑनेक्स आणि ग्रे अॅश अशा तीन रंगामध्ये असणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

सॅमसंगची फ्रिजवर ऑफर! 38 हजारांचा स्मार्टफोन मोफत; 9 हजारांचा कॅशबॅकही

अमेरिकेकडून चीनविरोधात युद्धाची तयारी?; दुसऱ्या महायुद्धातील नौदलाच्या 'विध्वंसक' तळाची पुन्हा उभारणी

शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल

कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे

Web Title: OnePlus Nord features leaked; setup of 6 cameras in a cheap phone and much more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.