सॅमसंगची फ्रिजवर ऑफर! 38 हजारांचा स्मार्टफोन मोफत; 9 हजारांचा कॅशबॅकही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 05:18 PM2020-07-13T17:18:00+5:302020-07-13T17:20:34+5:30

रेफ्रिजरेटरच्या दरवाजावर 21.5 इंचाचा फुल एचडी टचस्क्रीन देण्यात आली आहे. ही 15 वॉटच्या स्पिकरसोबत येते. युजर यामध्ये स्मार्टफोन किंवा टीव्हीच्या स्क्रीनला मिरर करू शकतात.

Samsung's offer on the fridge! smartphone of 38000 free; 9,000 cashback | सॅमसंगची फ्रिजवर ऑफर! 38 हजारांचा स्मार्टफोन मोफत; 9 हजारांचा कॅशबॅकही

सॅमसंगची फ्रिजवर ऑफर! 38 हजारांचा स्मार्टफोन मोफत; 9 हजारांचा कॅशबॅकही

Next

नवी दिल्ली : भारतात सध्या चीनविरोधी वातावरण असल्याने त्याचा फायदा अन्य देशांच्या कंपन्या घेऊ लागल्या आहेत. दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने भारतात Internet of Things उत्पादनांची रेंज वाढविण्याचे ठरविले आहे. यानुसार SpaceMax Family Hub Refrigerator भारतात लाँच केला असून यावर मोठी ऑफरही देऊ केली आहे. 


स्पेसमॅक्स फ्रिजसोबत कंपनीने 37,999 रुपयांचा Samsung Galaxy Note 10 Lite स्मार्टफोन मोफत देण्याची घोषणा केली आहे. तसेच 9000 रुपयांचा कॅशबॅकही देऊ केला आहे. या फ्रिजमध्ये अनेक चांगले फिचर दिले आहेत. हा फ्रिज 13 ते 26 जुलैदरम्यान बुक केल्यास ग्राहकाला हा कॅशबॅक दिला जाणार आहे. 


प्रिमिअम ब्लॅक मॅट फिनिशच्या रेफ्रिजरेटरची किंमत 2,19,900 रुपये आहे. हा फ्रिज 1,96,990 रुपयांच्या स्पेशल प्राईजमध्ये मिळणार आहे. या फ्रिजची स्टोरेज 657 लीटर असून हा घरातील अन्य स्मार्ट होम अल्पायन्सेससोबत जोडला जातो. याचा होम कंट्रोल आणि फॅमिली हब स्क्रीन फिचरद्वारे ग्राहक नियंत्रित करू शकतात. एवढेच नाहीत यामध्ये एक फूड मॅनेजमेंट फिचर देण्यात आले आहे. याद्वारे दरवाजा न उघडता आतमध्ये ठेवलेले पदार्थ तपासता येतात. 


रेफ्रिजरेटरच्या दरवाजावर 21.5 इंचाचा फुल एचडी टचस्क्रीन देण्यात आली आहे. ही 15 वॉटच्या स्पिकरसोबत येते. युजर यामध्ये स्मार्टफोन किंवा टीव्हीच्या स्क्रीनला मिरर करू शकतात. फॅमिली हब स्क्रीनवर मिरर करण्यासाठी होम एंटरटेनमेंट फीचरचा वापर करावा लागणार आहे. याशिवाय टेक्स्ट मेसेजही पाठविता येणार आहेत. या रेफ्रिजरेटरमध्ये ब्ल्यूटूथ आणि Bixby व्हॉईस असिस्टंसचा सपोर्ट देण्यात आला आहे. 


50 टक्के वीज वाचविणार
फ्रिजमध्ये ऑलराऊंड कुलिंग देण्यात आले आहे. याचा डिजिटल इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी 50 टक्के वीज वाचविते, असा दावा कंपनीने केला आहे. कुबट वास न येण्यासाठी डिओडराइजिंग फिल्टर देण्यात आला आहे. 
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

अमेरिकेकडून चीनविरोधात युद्धाची तयारी?; दुसऱ्या महायुद्धातील नौदलाच्या 'विध्वंसक' तळाची पुन्हा उभारणी

शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल

कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे

Web Title: Samsung's offer on the fridge! smartphone of 38000 free; 9,000 cashback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :samsungसॅमसंग