बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येतोय Oneplus Nord 2T 5G; लाँच डेट, किंमत आणि ऑफर्सचा खुलासा 

By सिद्धेश जाधव | Published: June 20, 2022 04:05 PM2022-06-20T16:05:49+5:302022-06-20T16:07:49+5:30

Oneplus Nord 2T 5G स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती समोर आली आहे.  

Oneplus nord 2t 5g may launch in india on june 27 price discount offer leaked online  | बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येतोय Oneplus Nord 2T 5G; लाँच डेट, किंमत आणि ऑफर्सचा खुलासा 

बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येतोय Oneplus Nord 2T 5G; लाँच डेट, किंमत आणि ऑफर्सचा खुलासा 

googlenewsNext

Oneplus Nord 2T 5G स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारात लाँच करण्यात आला होता. तेव्हापासून या हँडसेटच्या भारतीय लाँचची वाट वनप्लसचे चाहते बघत आहेत. आता या स्मार्टफोनच्या भारतीय लाँचचा खुलासा झाला आहे. एका लीकमधून हँडसेटच्या लाँच डेट, स्पेसिफिकेशन्स, किंमत आणि सेल्स ऑफर्सची देखील माहिती समोर आली आहे.  

Oneplus Nord 2T 5G ची भारतीय किंमत आणि उपलब्धता  

टिप्सटर Paras Guglani नं दिलेल्या माहितीनुसार Oneplus Nord 2T 5G स्मार्टफोन भारतात 27 जूनला लाँच होईल. तसेच फोनचे Shadow grey आणि Jade Fog कलर व्हेरिएंट देशात उपलब्ध होतील. लीकनुसार, वनप्लस नॉर्ड 2टी 5जी फोन 8GB RAM आणि 12GB RAM असे दोन ऑप्शन मिळतील. फोनच्या 8 जीबी रॅमची किंमत 28,999 रुपये असेल, तर 12 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये असेल.  

भारतात लाँच झाल्यानंतर हा फोन डिस्काउंटसह विकला जाईल. लीकमध्ये बँक ऑफर्सची देखील माहिती मिळाली आहे. फोनवर 4,000 रुपये पर्यंतची सूट मिळेल. बेस व्हेरिएंट 24,999 रुपये आणि तर मोठा व्हेरिएंट 27,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. वनप्लस नॉर्ड 2टी 5जी फोनची विक्री 3 जुलै ते 5 जुलै दरम्यान सुरु केली जाईल.  

OnePlus Nord 2T चे स्पेसिफिकेशन्स  

फोटोग्राफीसाठी OnePlus Nord 2T 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP चा Sony IMX766 सेन्सर OIS सह मुख्य कॅमेऱ्याचं काम करतो. सोबत 8MP चा Sony IMX35 अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 2MP तिसरा मोनोक्रोम सेन्सर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.  

यात 6.43 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. OnePlus Nord 2T 5G फोन Android 12 बेस्ड OxygenOS 12.1 वर चालतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर आहे, सोबत 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते, जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. OnePlus Nord 2T 5G मध्ये 4,500mAh ची बॅटरी 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह मिळते.    

 

Web Title: Oneplus nord 2t 5g may launch in india on june 27 price discount offer leaked online 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.