जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 17:36 IST2025-12-18T17:30:48+5:302025-12-18T17:36:12+5:30

OnePlus 15R Launched In India: मिड-रेंज स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी वनप्लसने नवा स्मार्टफोन आणला आहे.

OnePlus 15R Launched In India, Know Price and Specifications | जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!

जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!

स्मार्टफोन जगतातील दिग्गज कंपनी वनप्लसने भारतीय बाजारपेठेत आपला नवा शक्तिशाली स्मार्टफोन वनप्लस १५ आर अधिकृतपणे लॉन्च केला आहे. मिड-रेंज बजेटमध्ये फ्लॅगशिप लेव्हलचे अनुभव देणारा हा फोन आपल्या दमदार बॅटरी आणि अत्याधुनिक प्रोसेसरमुळे चर्चेत आला आहे. 

या फोनमध्ये क्वालकॉमचा सर्वात नवीन आणि शक्तिशाली Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी अत्यंत वेगवान आहे. या फोनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे यात ७४०० एमएएचजी बॅटरी देण्यात आली आहे, जी सुपरफास्ट चार्ज होते.

वनप्लसमध्ये ६.८३ इंचाचा १.५के AMOLED डिस्प्ले देण्यात आले असून त्याचा रिफ्रेश रेट 165Hz आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सेलची अल्ट्रा वाइड लेन्स मिळत आहे. शिवाय, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.  हा फोन १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी/५१२ जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

वनप्लस १५ आरच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत ४४ हजार ९९९ रुपये आहे. तर, १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५२ हजार ९९९ रुपये आहे. आयसीसीआय, एचडीएफसी आणि एक्सिस बँकेच्या कार्डवर ग्राहकांना ३००० रुपयांपर्यत इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकते. या स्मार्टफोनची विक्री भारतात २२ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. ग्राहक वनप्लसची अधिकृत वेबसाईट, ॲमेझॉन आणि ऑफलाईन स्टोअर्सवरून हा फोन खरेदी करू शकतात.

Web Title : OnePlus 15R शक्तिशाली फीचर्स के साथ भारत में लॉन्च!

Web Summary : OnePlus 15R भारत में लॉन्च, स्नैपड्रैगन 8 Gen 5, 7400mAh बैटरी और 165Hz AMOLED डिस्प्ले से लैस। इसमें 50MP कैमरा है और यह 12GB रैम वेरिएंट में उपलब्ध है, जिसकी शुरुआती कीमत ₹44,999 है। बिक्री 22 दिसंबर से शुरू।

Web Title : OnePlus 15R Launched in India with Powerful Features!

Web Summary : OnePlus 15R launched in India, boasting Snapdragon 8 Gen 5, a massive 7400mAh battery, and a 165Hz AMOLED display. It features a 50MP camera and is available in 12GB RAM variants, starting at ₹44,999. Sales begin December 22nd.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.