वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:15 IST2025-09-29T14:14:22+5:302025-09-29T14:15:47+5:30
OnePlus 15 Launch News: येत्या काही दिवसांत हा फोन चीनमध्ये लाँच होणार आहे. तर भारतात पुढील काही महिन्यांत ही सिरीज लाँच होणार आहे.

वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार...
काही महिन्यांपूर्वी अॅपल कंपनीने ओएसची सिरीज जंप केली होती. आता वनप्लस कंपनी ओएस नाही तर मोबाईल सिरीजच जंप करणार आहे. सध्या वनप्लसची १३ सिरीज भारतासह जगभरात सुरु आहे. परंतू, वनप्लस आता ‘वनप्लस 15’ आणायची तयारी करत आहे. येत्या काही दिवसांत हा फोन चीनमध्ये लाँच होणार आहे. तर भारतात पुढील काही महिन्यांत ही सिरीज लाँच होणार आहे.
या वनप्लस १५ मध्ये यात क्वालकॉमचा नवीनतम 'स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5' प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 6.82 इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले असून, त्याला 165Hz चा रिफ्रेश रेट दिला गेला आहे. विशेष म्हणजे हा डिस्प्ले कर्व्ड एज डिझाइनमध्ये उपलब्ध असेल, ज्यामुळे फोनला प्रीमियम लूक मिळेल.
या फोनमध्ये 7000mAh ची मोठी बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. ही ब्रटरी 120W च्या वेगवान चार्जिंगला सपोर्ट करेल. यामुळे फोनची बॅटरी एकाच चार्जमध्ये दिवसभर टिकेल आणि लवकर चार्ज होईल. या फोनमध्ये तीन 50-मेगापिक्सेल सेन्सर असलेला आयताकृती ट्रिपल-रिअर कॅमेरा सेटअप असेल. यात एक मुख्य लेन्स, एक टेलीफोटो लेन्स आणि एक अल्ट्रा-वाइड कॅमेरा समाविष्ट आहे.
हा फोन आधी चीनमध्ये लाँच होईल आणि त्यानंतर पुढील महिन्यात म्हणजे जानेवारीत भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. भारतातील याची सुरुवातीची किंमत सुमारे 70,000 रुपये असण्याचा अंदाज आहे.