शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:32 IST

Dor TV Fraud: झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ, स्ट्राइड व्हेंचर्स आणि मायक्रोमॅक्स इन्फॉर्मेटिक्स यांच्या सहकार्याने स्ट्रीमबॉक्स मीडियाने डोर टीव्ही लाँच केला होता.

सबस्क्रीप्शनवर टीव्ही फ्रीमध्ये वाटणारी कंपनी Streambox Media ने ग्राहकांना फसविले आहे. डोर टीव्ही (Dor TV) घेणाऱ्या ग्राहकांसाठी ही महत्वाची आणि तेवढीच धक्कादायक बातमी आहे. कंपनीने डोर सेवा बंद केल्याचे जाहीर केले आहे. 

स्ट्रीमबॉक्स मीडियाच्या वेबसाइटवर "सार्वजनिक घोषणा: डीओआर सेवा बंद केली" असा संदेश दाखविण्यात येत आहे. 8 महिन्यांपूर्वी या कंपनीने सबस्क्रिप्शन-आधारित स्मार्ट टीव्ही विकण्यास सुरुवात केली होती. वर्षभराच्या सबस्क्रीप्शनचे पैसे मासिक किवा वार्षिक प्लॅनमध्ये ही कंपनी घेत होती, या ग्राहकांना ती टीव्ही देत होती. यासाठी वेगळे पैसे मोजावे लागत नव्हते. 

परंतू, आता ज्यांनी हे स्बस्क्रीप्शन घेतले आहे, त्यांचे वांदे झाले आहेत. कारण टीव्ही तसाच पडून राहणार आहे. शिवाय हे सबस्क्रीप्शन अन्य कोणत्याही टीव्ही किंवा मोबाईलवरही चालणार नाहीय. झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ, स्ट्राइड व्हेंचर्स आणि मायक्रोमॅक्स इन्फॉर्मेटिक्स यांच्या सहकार्याने स्ट्रीमबॉक्स मीडियाने डोर टीव्ही लाँच केला होता. 

ज्यांनी कोणी हे टीव्ही घेतलेत त्यांची आता अडचण झाली आहे. कंपनीने आता अचानक सेवा बंद केली असून ग्राहकांनी काय करावे किंवा त्यांना पैसे परत मिळणार की नाहीत याबाबत काहीच माहिती उपलब्ध झालेली नाहीय. या सब्रस्क्रिप्शनमध्ये २४ पेक्षा जास्त ओटीटी दाखविले जाणार होते. ४३ इंच, ५५ इंच आणि ६५ इंचाच्या टीव्ही पर्याय उपलब्ध करण्यात येणार होते. त्यापैकी सध्या केवळ ४३ इंचाचा टीव्हीच उपलब्ध होता. टीव्ही आणि कंटेंट सबस्क्रिप्शनची किंमत १०,७९९ रुपये होती. यामुळे ग्राहकांना दर महिन्यासाठी ७९९ रुपये खर्च करावे लागणार होते. परंतू, ही संपूर्ण वर्षाची रक्कम आगाऊ द्यावी लागल्याने आता हे ग्राहक अडचणीत आले आहेत. 

 

टॅग्स :Nithin Kamathनितीन कामथ