शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

आता चंद्रावर वाजणार स्मार्टफोनची रिंग! नासाचा ऐतिहासिक निर्णय; अंतराळवीर नेणार स्वतःचे मोबाईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 06:24 IST

आता चंद्रावरही वाजणार मोबाईलची रिंग! नासाने अंतराळवीरांना वैयक्तिक स्मार्टफोन नेण्याची परवानगी दिली आहे. आर्टेमिस-२ मोहिमेत दिसणार तंत्रज्ञान आणि मानवी संवेदनांचा संगम. वाचा सविस्तर.

चंद्रावर मानवी वस्ती करण्याचं माणसाचं स्वप्न आहे. मानवाचं हे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरेल, असा संशोधकांचा दावा आहे. ते खरोखरच कधी प्रत्यक्षात येईल ते माहीत नाही; पण चंद्रावर येत्या काही दिवसांत स्मार्टफोनची रिंग वाजेल हे नक्की. 

याशिवाय आता चंद्राच्या पृष्ठभागावरून मेसेजेस, फोटो आणि व्हिडीओ पाठवणं ही विज्ञानकथेतली कल्पना न राहता प्रत्यक्षात साकार होणार आहे. क्रू-१२ आणि आर्टेमिस-२ मोहिमांच्या माध्यमातून अंतराळवीर लवकरच अंतराळात जाणार आहेत. या मोहिमांदरम्यान नासानं पहिल्यांदाच अंतराळवीरांना वैयक्तिक स्मार्टफोन अंतराळात नेण्याची मुभा दिली आहे. तंत्रज्ञान आणि मानवी स्पर्श यांचा हा संगम अंतराळ संशोधनाच्या नव्या युगाची सुरुवात मानला जात आहे.

अंतराळात, चंद्रावर नेल्या जाणाऱ्या या स्मार्टफोनचा उद्देश फक्त मनोरंजनापुरता मर्यादित नसून, अंतराळप्रवासाचं दस्तऐवजीकरण करणं आणि अनुभव शेअर करणं हाही आहे. नासाच्या या ऐतिहासिक निर्णयानं अंतराळ मोहिमांची दिशाच बदलून टाकली आहे. यामुळे भविष्यातील चंद्र मोहिमांमध्ये अंतराळवीरांच्या हातात आयफोन आणि इतर आधुनिक स्मार्टफोन दिसणं सामान्य बाब ठरणार आहे. हा निर्णय त्यांना केवळ तांत्रिकदृष्ट्या अधिक सक्षम करणार नाही, तर अंतराळ संशोधनाला वैयक्तिक, जिवंत आणि मानवी अनुभवांशी जोडण्यासही मदत करणार आहे.

नासाच्या मते, स्मार्टफोन तंत्रज्ञानानं ज्या वेगानं प्रगती केली आहे, त्यामुळे मोबाइल आता केवळ विश्वासार्हच नाहीत, तर अनेक बाबतीत प्रगत स्पेस कॅमेऱ्यांना पर्यायही ठरू शकतात. अंतराळवीरांनी टिपलेले वैयक्तिक व्हिडीओ आणि अनुभव भविष्यातील संशोधनासाठीही उपयुक्त ठरणार आहेत. हा निर्णय अंतराळ मोहिमांना आधुनिक युगातील सोशल मीडिया कनेक्टिव्हिटीशी सुसंगत करण्याच्या उद्देशानं घेतला गेला आहे. यामुळे अंतराळ आणि पृथ्वीतील भावनिक अंतर कमी होईल. लोकांना या मोहिमा फक्त वैज्ञानिक प्रकल्प न वाटता मानवी प्रवासासारख्या भासतील. 

नासानं अनेक वर्षे अंतराळात वैयक्तिक फोनबाबत सावध भूमिका घेतली होती. स्मार्टफोनमधून निघणारे रेडिओ सिग्नल अंतराळयानाच्या नेव्हिगेशन सिस्टीमवर परिणाम करतील का, ही सर्वात मोठी चिंता होती. त्याशिवाय हे स्मार्टफोन विश्वातील विकिरण आणि दाब सहन करू शकतील का, याबद्दलही शंका होती. अंतराळस्थानकामधील संवेदनशील उपकरणांत मोबाइलच्या वेव्हलेंथमुळे बिघाड होण्याचाही धोका होता. या सर्व कारणांमुळे वैयक्तिक फोन अंतराळात नेणं धोकादायक मानलं जात होतं, मात्र तांत्रिक सुधारणांनंतर आता ते सुरक्षित समजलं जात आहे.

या निर्णयामुळे अंतराळवीरांना अभूतपूर्व स्वातंत्र्य मिळणार आहे. ते चंद्राच्या पृष्ठभागावरून स्वतःच्या भावना, विचार, दृश्यं आणि अनुभव थेट शेअर करू शकणार आहेत. कुटुंबाशी जोडलेपण, तणाव नियंत्रण, भावनिक समतोल आणि मानसिक आरोग्यासाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. यासोबतच सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून अंतराळाची दुनिया सामान्य लोकांच्या आयुष्याशीही जोडली जाईल. येणारा काळ अंतराळविज्ञान आणि मानवी संवेदनांचा अद्भुत संगम घडवून आणेल आणि कदाचित लवकरच चंद्रावर वाजणारी स्मार्टफोनची रिंग हे एक सामान्य दृश्य ठरेल. हा बदल अंतराळप्रवासाला एका मानवी कथेत रूपांतरित करेल!

English
हिंदी सारांश
Web Title : NASA allows astronauts to take smartphones to the moon!

Web Summary : NASA permits astronauts to carry smartphones to space for documentation and sharing experiences. This decision aims to connect space missions with modern social media, reducing emotional distance and making them relatable human journeys. Concerns about signal interference have been addressed through technological advancements.
टॅग्स :Moonचंद्रNASAनासा